*पंढरपूर सिंहगड मध्ये "भ्रष्टाचार का विरोध करे राष्ट्र के प्रति समर्प्रीत करे" हा उपक्रम उत्साहात संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस. के. एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात भ्रष्टाचार का विरोध करे राष्ट्र के प्रति समर्प्रीत करे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला व तसेच केंद्रीय दक्षता आयोग (CVC) देशातील सर्वोच्च अखंडता संस्था दरवर्षी दक्षता जागरुकता सप्ताह चे आयोजन करते. या वर्षी सी व्ही सी नुसार सातदिवशी दक्षता जागरुकता सप्ताह साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन करून दिपप्रज्वलाने करण्यात आली.
यामध्ये उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी म्हणाले सत्ता, अधिकार आणि स्थानाचा गैरवापर करणे हा भ्रष्टाचाराचा व्यापक अर्थ आहे. त्याचबरोबर लाच घेणे व देणे, वशिलेबाजी, काळा बाजार करणे, प्रमाणापेक्षा जास्त नफा कमावणे आदींचाही भ्रष्टाचारात समावेश होतो. समाजामध्ये भ्रष्ट व्यक्तींना प्रतिष्ठा मिळणे. कोणत्याही मार्गाने पैसा मिळवला तरी चालेल, असा दृष्टिकोन रूढ झाला आहे. सामाजिक नीतीमत्तेचे नियम शिथिल झाले आहेत आणि भौतिक सुखापुढे नीतीमत्ता गौण ठरवली जात आहे असे मत डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते प्रबोधनकार नागेंद्रकुमार नायकुडे यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विभागामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध माहिती प्रशासकीय कार्यकालीन कामकाज पद्धतीतला ही वेळकाढू, दीर्घ मुदतीची आणि गुंतागुंतीची असतो. यामुळे लाच देऊन लवकर कामे करवून घेण्यात येतात. राज्य आणि प्रशासनाच्या कार्याची व्याप्ती आधुनिक काळात वाढलेली आहे. नागरिकांना त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनावर अवलंबून राहावे लागत असल्याने त्यांची अडवणूक करून अतिरिक्त लाभ मिळवण्याचा प्रयत्न प्रशासकीय कर्मचारी करतात. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, हितसंबंधी यांच्यातील लागेबांध्यामुळे सर्व प्रशासकीय प्रक्रिया भ्रष्ट होतात. वर उल्लेखलेल्या कारणांव्यतिरिक्त मानवी स्वभाव आणि प्रवृत्ती हे भ्रष्टाचाराचे मूळ कारण आहे. स्वार्थीपणा, लोभ, लालसा या मानवी स्वभावातील सहज प्रवृत्ती आहेत. या वृत्तींना माणूस बळी पडतो आणि अतिलालसा बाळगतो, तेव्हा चांगल्या-वाईटाचा विचार न करता माणूस सहज भ्रष्ट बनतो. भ्रष्टाचाराची कारणे ही देशनिहाय, काळानुरूप आणि परिस्थितीनुसार भिन्न असली, तरी वर उल्लेख केलेली कारणे सर्वसाधारणपणे सार्वत्रिकरीत्या आढळून येत असल्याचे मत नागेंद्रकुमार नायकुडे यांनी व्यक्त केल.
राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी सर्व कामांमध्ये एक सुंदरता जपली पाहिजे व एकजुटीने काम केले पाहिजे असे आपले मत मांडले. व त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पंधे व हर्षद शिंदे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार करताना कोणतीही गोष्ट ही प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडली पाहिजे असे मत प्रा. सुमित इंगोले यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख व प्रा. सुमित इंगोले यांच्यासह एन एस एस प्रेसिडेंट नागेंद्रकुमार नायकुडे, एनएसएस सेक्रेटरी अथर्व कुराडे, प्रमुख विद्यार्थी प्रतिनिधी किशोर नरळे, नाना वाघमारे, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी रशीद पठाण, हर्षद शिंदे, सत्यम कापले, आकाश चौगुले, अनुप नायकल, प्रणव देवराम, सुमित अवताडे, वैष्णवी कंडरे, श्रद्धा पंधे, साक्षी भिवरे, प्राप्ती रुपनर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.