पंढरपूर रोटरी क्लबचे काम कौतुकास्पद- प्रांतपाल रूकमेश जकोटिया* ○ *पंढरपूर रोटरी क्लब ची वार्षिक आढावा बैठक उत्साहात*

 *पंढरपूर रोटरी क्लबचे काम कौतुकास्पद- प्रांतपाल रूकमेश जकोटिया*


○ *पंढरपूर रोटरी क्लब ची वार्षिक आढावा बैठक उत्साहात*



पंढरपूर: प्रतिनिधी


प्रत्येक रोटरी क्लब ला अभिमान वाटेल असे काम पंढरपूर रोटरी क्लबने केला आहे. रोटरी क्लब अतिशय चागंले उपक्रम राबवून १६० प्रकल्प केले. हे काम खरच कौतुकास्पद आहे. भविष्यात सर्वांनी एकत्र मिळून चागंले काम करावे. सामाजिक कार्य करीत असताना पैसा आवश्यक असते. सर्वांनी सहकार्याची भावना ठेवून रोटरी क्लबचे काम करावे असे मत प्रांतपाल यांनी वार्षिक आढावा बैठक बोलताना व्यक्त केले.

   रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांची वार्षिक आढावा बैठकी मंगळवार दिनांक २ मे २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता रोटरी भवन पंढरपूर येथील कार्यालयात उत्साहात पार पडली. असल्याची माहिती रोटरी क्लब अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.

    या बैठकीच्या सुरुवातीस सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान डिस्टिक गव्हर्नर रो. रूकमेश जकोटीया यांचे स्वागत रोटरी क्लब ऑफ पंढरपूर उपक्रमशील अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. तसेच रो. सुरेखा जकोटिया यांचे स्वागत प्रा. निशा करांडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. 

   रोटरीचे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, रोटरी क्लब ची स्वतंत्र वास्तु असणे आवश्यक होते. त्यासाठी पाठपुरावा करून नगरपालिके कडून जागा उपलब्ध करून सर्वांनी सहकार्य करून वास्तु उभा केली. या वर्षात विविध सामाजिक उपक्रम राबवून अनेक प्रकल्प करण्यात आले. रोटरी क्लब सदस्यांनी खुप मदत केली. आवश्यक असलेल्या ठिकाणी मदत रोटरी क्लबने पोहचवली असल्याचे मदत डाॅ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले.

   दरम्यान रोटरीचे सचिव सचिन भिंगे यांनी रोटरी क्लबचा वार्षिक घेण्यात आलेल्या विविध सामाजिक १६० उपक्रम याबाबतचा

वार्षिक आढावा उपस्थित मान्यवरांसमोर सादर केला.

    उपस्थित प्रमुख पाहुणे प्रांत प्राल रो. रूकमेश जकोटीया यांचा परिचय रो. दिपक चोथे यांनी करून दिला.


रोटरी क्लबचे मुखपञ चंद्रभागा बुलेटीनचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यादरम्यान रोटरी क्लब कडून सेवा व सहकार्य करणाऱ्या मान्यवरांना गुलाब व सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार देण्यात आले.

    या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ. संगिता पाटील व रो. विश्वास आराध्ये यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव सचिन भिंगे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad