मिलेनियम पब्लिक स्कूलचे जिल्हास्तरावर सिंगल बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा अजिंक्यपद --- प्रिया विलासराव तोडे विभागीय स्तरासाठी पात्र. नायगांव / प्रतिनिधी ( परमेश्वर पा.जाधव)

 मिलेनियम पब्लिक स्कूलचे जिल्हास्तरावर सिंगल बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा अजिंक्यपद --- प्रिया विलासराव तोडे विभागीय स्तरासाठी पात्र.

नायगांव / प्रतिनिधी 

( परमेश्वर पा.जाधव) 



आयोजित केलेल्या तालुकास्तरीय सिंगल बैडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून जिल्हा स्तरावर पात्र ठरल्यानंतर जिल्हास्तरावर दि. 8/12/22 - रोजी आयोजित शासकिय जिल्हा क्रीडा स्पर्धत देखिल प्रिया तोडे अजिंक्य राहुन मिलेनियम पब्लिक स्कुलचे नावलौकीक केलेले आहे आणि विभागीय स्तरासाठी पात्र ठरलेली आहे. या बातमीने तालुक्याची मान उंचावलेली असुन श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ, होटाळा चे अध्यक्ष मा. श्री. शिवराज पाटील होटाळकर यांनी प्रिया तोडे हिचे तोंड भरुन कौतुक केले आहे. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या. श्री दत्तशिक्षण प्रसारक मंडळ होटाळाचे प्रशासकीय प्रमुख श्री. फाजगे सर, प्राचार्य तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला असून प्रिया तोडे या विदयार्थीनीस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad