*अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एनएसएस (NSS) स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग*
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे अभिजात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या अहिल्याभवन येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या सहकार्याने प्रा. मासाळ सर व प्रा. इनामदार सर यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून सहभाग घेतला.
मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा, साहित्यिक वारसा आणि संवर्धनाची गरज याबाबत कार्यक्रमातून जनजागृती करण्यात आली. NSS स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेत मराठी भाषेप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीविषयी अभिमानाची भावना निर्माण होण्यास मदत झाली. एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर यांच्या NSS पथकाचा सहभाग हा कार्यक्रमातील विशेष उल्लेखनीय भाग ठरला.

