एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी पंढरपूरच्या व्हॉलीबॉल संघाची विद्यापीठस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपदाला गवसणी.

 एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी पंढरपूरच्या व्हॉलीबॉल संघाची विद्यापीठस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपदाला गवसणी.



पंढरपूर : प्रतिनिधी


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूरच्या व्हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण १७ संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सिंहगडच्या संघाने उपविजेतेपद मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.


संघातील खेळाडूंनी सांघिक भावना, जिद्द, मेहनत, शिस्त आणि उत्कृष्ट खेळभावनेच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली. या यशासाठी महाविद्यालयाचे क्रीडाप्रमुख प्रा. अनिल जाधव, प्रा. बाळकृष्ण जगदाळे ,प्रा. सचिन घाडगे आणि डॉ.नामदेव सावंत

यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.


या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आणि उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी संघाचे अभिनंदन करून खेळाडूंचे कौतुक केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. विद्यापीठ स्तरीय पुढील कॅम्प साठी 

कु.शिवम देशमुख, कु.साई मिसाळ, कु.सागर नायर, कु.जयेश भोसले यांची निवड झाली आहे.


विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयाकडून सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य केले जात असून, या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली आहे.


सिंहगडच्या व्हॉलीबॉल संघाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.