सिंहगड, कोर्टी पंढरपूर ने आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून सिंहगड च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला.

 सिंहगड, कोर्टी पंढरपूर ने आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून सिंहगड च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला.



पंढरपूर : प्रतिनिधी


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन (मुले) स्पर्धेत एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील संघाने तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक मिळविले.


या स्पर्धेत महाविद्यालयाच्या कु.ओजस कवडे, कु.संस्कार कुंभार, कु.रोहन दुधे आणि कु.

अमेय भाटे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडाप्रमुख प्रा. अनिल जाधव आणि प्रा. बाळकृष्ण जगदाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.


या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संचालक व कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आणि उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे विशेष कौतुक केले. पुढील विद्यापीठ स्तरीय कॅम्प साठी

कु.ओजस कवडे, कु.संस्कार कुंभार, आणि कु.

अमेय भाटे यांची निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्याची महाविद्यालयाची परंपरा या यशामुळे अधोरेखित झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.