एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात नोएस्क्युएल('NoSQL) डेटाबेस : MongoDB( मोगोडीबी ) ची प्रात्यक्षिकासह ओळख' विषयावर ऑनलाईन व्याख्यान मोठ्या उत्साहात पार पडले.

 एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात नोएस्क्युएल('NoSQL) डेटाबेस : 

MongoDB( मोगोडीबी ) ची प्रात्यक्षिकासह ओळख' विषयावर ऑनलाईन व्याख्यान मोठ्या उत्साहात पार पडले.



पंढरपूर, प्रतिनिधी

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथे संगणक विज्ञान अभियांत्रिकी विभागाच्या

वतीने तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 'Exploring NoSQL Databases: A Practical Introduction

to MongoDB' या विषयावर विशेष ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना आधुनिक डेटाबेस तंत्रज्ञान, NoSQL डेटाबेसच्या मूलभूत संकल्पना तसेच उद्योग क्षेत्रात मोठ्या

प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या MongoDB डेटाबेसची प्रत्यक्ष माहिती मिळावी, या उद्देशाने या व्याख्यानाचे

आयोजन करण्यात आले.

या व्याख्यानासाठी पुणे येथील विप्रो लिमिटेड कंपनीचे सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर श्री. प्रकाश वाघमोडे आणि

टेक लीड श्री. नारायण घोलप यांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आजच्या डिजिटल

युगात सोशल मीडिया, ई-कॉमर्स, ऑनलाइन बँकिंग, मनोरंजन तसेच IoT यांसारख्या क्षेत्रांत दररोज प्रचंड

प्रमाणात डेटा निर्माण होत आहे. असा मोठा आणि सतत बदलणारा डेटा जलद, सुरक्षित व लवचिक पद्धतीने

साठवण्यासाठी आणि हाताळण्यासाठी NoSQL डेटाबेस अत्यंत उपयुक्त ठरतात. MongoDB सारख्या

तंत्रज्ञानामुळे वेगवान, विश्वासार्ह आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार करता येणारी ॲप्लिकेशन्स कमी खर्चात

विकसित करता येतात, असेमार्गदर्शकांनी सांगितले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळेविद्यार्थ्यांना हेतंत्रज्ञान आपल्या

प्रकल्पांमध्येवापरण्याचा आत्मविश्वास मिळाला. आयटी उद्योगात डेटाबेस डेव्हलपर, बॅकएंड डेव्हलपर व डेटा

इंजिनिअर यांसारख्या पदांसाठी या कौशल्यांना मोठी मागणी असल्याने विद्यार्थ्यांनी याचा सखोल अभ्यास

करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

बदलत्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवनवीन संधींची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी आणि त्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर

पडावी, यासाठी विभागामार्फत विविध व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि तांत्रिक उपक्रमांचे नियमितपणे

आयोजन केले जाते. या व्याख्यानाचे समन्वयन डॉ. नामदेव सावंत यांनी केले. विभागप्रमुख डॉ. सुभाष

पिंगळे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे या उपक्रमासाठी मोलाचे

मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.

या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक डेटाबेस तंत्रज्ञानाचे महत्त्व समजून त्यांच्या तांत्रिक ज्ञानात आणि कौशल्यात निश्चितच भर पडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.