*पंढरपूर तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतनचे दैदिप्यमान यश;* संध्या भोसले व रुद्र पवार यांची जिल्हास्तरावर निवड

 *पंढरपूर तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतनचे दैदिप्यमान यश;* 

संध्या भोसले व रुद्र पवार यांची जिल्हास्तरावर निवड



 पंढरपूर तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा २०२६ मध्ये श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. प्रशालेतील संध्या भोसले आणि रुद्र पवार या दोन्ही गुणवंत खेळाडूंनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) पटकावला असून, या शानदार कामगिरीच्या जोरावर त्यांची आगामी जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे प्रशालेच्या प्राचार्या आदरणीय सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन व भक्कम पाठिंबा लाभला. त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांमुळेच विद्यार्थ्यांना हे यश मिळवणे शक्य झाले. तसेच, शाळेचे क्रीडा शिक्षक विकास कदम सर आणि विकास रितोंड सर यांनी घेतलेली मेहनत आणि दिलेल्या विशेष प्रशिक्षणाचा या यशामध्ये अत्यंत मोलाचा वाटा आहे.

तालुकास्तरावर शाळेचा नावलौकिक वाढवणाऱ्या संध्या भोसले आणि रुद्र पवार या दोन्ही खेळाडूंचे श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून हार्दिक अभिनंदन केले व त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेतील पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.