स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ उत्साहात


स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ उत्साहात 




पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या 'मेसा' तथा मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने स्वेरीत ‘नो प्रायवेट व्हेईकल डे’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. 


       या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वतःची खासगी वाहने, विशेषतः दुचाकी व चारचाकी वाहने, महाविद्यालयात न आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याऐवजी महाविद्यालयीन बस, सार्वजनिक वाहतूक, सायकल अथवा पायी महाविद्यालयात येण्यास प्रोत्साहन देण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश इंधनाची बचत करणे, वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे, शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देणे आणि पर्यावरणीय जबाबदारीबाबत जनजागृती करणे हा होता. ‘इंधन वाचवा, प्रदूषण कमी करा, शाश्वत गतिशीलतेला चालना द्या.' शाश्वत सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन द्या, इंधन बचतीस प्रोत्साहन द्या, वाहनांमुळे होणारे उत्सर्जन कमी करा या शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यात आले. यामध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ व त्यांचे इतर प्राध्यापक वर्ग टांग्यातून व सायकलवरून, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार हे बसने तर डी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. सतीश मांडवे टमटम ने कॉलेजला आले. स्वेरीचे काही स्टाफ हे एस.टी. ने कॉलेजला आले, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार ह्या ऑटो रिक्षाने महाविद्यालयात पोहोचल्या. एकूणच स्वेरीचे प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारीसहित सर्व स्टाफ यांनी गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वतःच्या वाहनाला सुट्टी दिली होती. यामुळे स्वेरी कॅम्पस मध्ये पार्किंगचे ठिकाण पूर्णतः रिकामे दिसत होते. या उपक्रमाचे आयोजन ‘मेसा' अध्यक्ष आदित्य डुबल, उपाध्यक्ष अश्विनी भोंग, सचिव रोहन नागरे यांच्या सहकार्याने करण्यात आले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस. एस. वांगीकर, मेसा समन्वयक प्रा. कुलदीप पुकाळे यांच्यासह महाविद्यालय प्रशासनाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि शाश्वत वाहतुकीबाबत विद्यार्थ्यांमध्ये व महाविद्यालयीन समुदायामध्ये जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम ठरला. या उपक्रमाची चर्चा दिवसभर होत होती.


चौकट-


सध्या पुणे विभाग शिक्षक मतदान प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे स्वेरीचे सर्वेसर्वा डॉ.बी.पी. रोंगे सर हे संभाव्य उमेदवार असल्यामुळे पाचही जिल्ह्यातील शिक्षकांच्या गाठी भेटी घेवून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात व्यस्त आहेत तरीही स्वेरीमध्ये दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ उपक्रमासाठी त्यांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.