विद्यार्थ्यांची कार्यशाळा आणि उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ओळख होते' -स्पेक्ट्रा टेकचे संस्थापक संचालक केशव ताम्हणकर प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये ‘एसएईइंडिया कॉलेजिएट क्लब’ चा स्थापना सोहळा संपन्न



'विद्यार्थ्यांची कार्यशाळा आणि उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ओळख होते' -स्पेक्ट्रा टेकचे संस्थापक संचालक केशव ताम्हणकर


प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये ‘एसएईइंडिया कॉलेजिएट क्लब’ चा स्थापना सोहळा संपन्न



पंढरपूर-‘आजच्या स्पर्धात्मक युगात उद्योगाच्या गरजांनुसार सक्षम, संशोधनाभिमुख आणि भविष्यवेधी अभियंते घडविण्याची आवश्यकता आहे. शैक्षणिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी एसएईइंडिया अंतर्गत आयोजित विविध तांत्रिक प्रकल्प, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा, कार्यशाळा आणि उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. नवोपक्रम, शाश्वत तंत्रज्ञान आणि सतत शिकण्याची वृत्ती या गुणांच्या माध्यमातून विद्यार्थी जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करू शकतात.’ असा विश्वास एसएईइंडिया वेस्टर्न सेक्शनचे सचिव तथा स्पेक्ट्रा टेकचे संस्थापक संचालक केशव विनायक ताम्हणकर यांनी व्यक्त केला.

              गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) येथे स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली 

शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी एसएईइंडिया कॉलेजिएट क्लबचा स्थापना सोहळा अलीकडेच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना स्पेक्ट्रा टेकचे संस्थापक संचालक ताम्हणकर हे मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमासाठी ऑटोमोबाईल उद्योगातील उत्पादन, विकास, मोबिलिटी सोल्युशन्स व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ तज्ज्ञ मिलिंद रामदासी, एसएईइंडिया वेस्टर्न सेक्शनचे गव्हर्निंग बोर्ड सदस्य महेश मसुरकर, व्यवस्थापक सागर मुरुगकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ऑटोमोबाईल अभियांत्रिकी क्षेत्रातील तांत्रिक नवोपक्रम, नेतृत्व विकास आणि उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष अतिथी मिलिंद ए. रामदासी यांनी आपल्या भाषणातून उद्योगातील अनुभवातून ऑटोमोबाईल क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादन विकास, संशोधन आणि कौशल्य विकासाच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उद्योग क्षेत्रातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता, व्यावहारिक ज्ञान आणि संघभावना जोपासण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. या कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी एसएईइंडिया कॉलेजिएट क्लबच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळाही संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली तसेच वर्षभर विविध तांत्रिक, संशोधनात्मक, उद्योगाभिमुख उपक्रम, तज्ज्ञ व्याख्याने, कार्यशाळा, औद्योगिक भेटी आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी ‘एसएईइंडिया कॉलेजिएट क्लब’ च्या विद्यार्थी पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये पदाधिकारी म्हणून विद्यार्थी अध्यक्ष वेदांत विश्वासराव देशमुख, उपाध्यक्ष संस्कार रविकांत मोरे, सचिव गौरी शिवलिंग महाजन, कोषाध्यक्ष श्रद्धा शिवलिंगप्पा कारभारी, रिसेप्शन चेअर यज्ञा नागेश जाधव, प्रोग्राम चेअर ओम दिलीप गाडे, पब्लिसिटी चेअर आदित्य मल्लिकार्जुन माळी, मेंबरशिप चेअर अथर्व सदानंद गवळी, इंडस्ट्री कनेक्ट चेअर अक्षता महेंद्र शिंदे आणि प्रोजेक्ट चेअर साक्षी संतोष कारंडे यांची निवड करण्यात आली. पाहुण्यांचे हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, गुणवत्तापूर्ण शिक्षणाविषयीची दृढ बांधिलकी आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे तसेच महाविद्यालयातील उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने अशा उद्योगाभिमुख उपक्रमांना सातत्याने चालना मिळत आहे. विभागातील सर्वांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे तसेच एसएईइंडिया कॉलेजिएट क्लबचे स्वेरीतील सल्लागार डॉ. दिग्विजय रोंगे, समन्वयक डॉ. नितीन कौटकर, सह-समन्वयक प्रा. स्वप्ना वसेकर, वर्कशॉप इन्चार्ज डॉ.एस.बी. भोसले, समन्वयक प्रा. डी.टी. काशीद, आयक्युएसी व विभागप्रमुख डॉ.एस. एस. वांगीकर, अधिष्ठाता डॉ.आर.आर. गिड्डे, तसेच ‘एसएईइंडिया कॉलेजिएट क्लब’ च्या विद्यार्थी प्रतिनिधींनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. या यशस्वी कार्यक्रमाबद्दल स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सूरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी ‘एसएईइंडिया कॉलेजिएट क्लब’ च्या नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.