सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात ‘स्पार्क्स 2के26’ उत्साहात संपन्न.

 सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात ‘स्पार्क्स 2के26’ उत्साहात संपन्न.



पंढरपूर : एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, तांत्रिक ज्ञानाला व सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘स्पार्क्स 2के26’ हा कार्यक्रम दिनांक 6 ऑक्टोबर 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. 

या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी क्विझ, ॲक्वाक्राफ्ट, मटेरियल मिस्ट्री आणि गेमिंग अशा विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. क्विझ स्पर्धेमधून विद्यार्थ्यांच्या सामान्यज्ञानासह तांत्रिक व बौद्धिक क्षमतेची चाचणी घेण्यात आली. ॲक्वाक्राफ्टमध्ये विद्यार्थ्यांनी कल्पकता व तांत्रिक कौशल्याचा वापर करून विविध कलाकृती सादर केल्या. मटेरियल मिस्ट्री या उपक्रमातून बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या विविध साहित्याविषयी विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि निरीक्षण कौशल्य तपासण्यात आले.

गेमिंग विभागामध्ये बीजीएमआय, फ्री फायर आणि लुडो या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. 

विविध महाविद्यालयांतील 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी ‘स्पार्क्स 2के26’ मध्ये सहभाग नोंदवून कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाचे आयोजन मोरे ऑप्टिकल्स, कार्निव्हल ऑटोमोबाईल, बाबर ट्रॅव्हल्स, साई कॅफे, निकटे सप्लिमेंटरी स्टोअर, आनंदमाया ज्वेलर्स, आनंदमाया आर्किटेक्चर आणि कार्तिक ॲडव्हर्टाइजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील प्रायोजकांनी दिलेल्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक प्रा. अजित करांडे, विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. कैलाश करांडे,  यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सेसा विद्यार्थी प्रतिनिधी, सदस्य आणि स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कल्पकता, तांत्रिक कौशल्य, संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘स्पार्क्स 2के26’ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.