स्वेरीमध्ये अभियंता दिनी ‘भव्य रक्तदान शिबिर’ संपन्न स्वेरीतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम

 बातमी दि. १८ सप्टेंबर २०२६


स्वेरीमध्ये अभियंता दिनी ‘भव्य रक्तदान शिबिर’ संपन्न


स्वेरीतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम 



पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.) विभाग व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभियंता दिना’चे औचित्य साधून मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी ‘भव्य रक्तदान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

          स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली या ऐच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन भारत सरकारच्या कोल्हापूर विभागातील आयकर विभागात (इन्कम टॅक्स) निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले राजानंद अर्जुन लोणकर तसेच वेळापूर मधील न्यु इंग्लिश स्कूलच्या सहशिक्षिका शितल काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन. एस. कागदे, विश्वस्त एच. एम. बागल, विश्वस्त बी. डी. रोंगे, सचिव डॉ. सूरज रोंगे, इतर सदस्य, प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ऐच्छिक रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी, अध्यापक वर्ग तसेच कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून 'रक्तदान हेच श्रेष्ठदान' हा सामाजिक संदेश दिला. विशेष म्हणजे या उपक्रमात तब्बल १४८ ऐच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान करून अमूल्य योगदान दिले. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे युवकांनी व समाजातील प्रत्येक घटकाने अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी स्वेरीतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. स्वयंसेवकांनी रक्तदात्यांची नोंदणी, मार्गदर्शन, शिस्त व इतर आवश्यक व्यवस्थापनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदाते, प्राध्यापक, कर्मचारी आणि एन. एस. एस. स्वयंसेवकांचे मनःपूर्वक कौतुक केले. समाजहितासाठी रक्तदानासारख्या उपक्रमांची आवश्यकता असून, स्वेरी या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती यांच्यासह एन.एस.एस.चे सर्व स्वयंसेवक, प्राध्यापक व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.