कोर्टी, पंढरपूर येथील एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 'सक्सेसफुल इंजिनिअरिंग करिअर- कानमंत्र यशस्वी इंजिनिअरिंग करिअरचा' या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

 कोर्टी, पंढरपूर येथील एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 'सक्सेसफुल इंजिनिअरिंग करिअर- कानमंत्र यशस्वी इंजिनिअरिंग करिअरचा' या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन. 



पंढरपूर : एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रथम वर्ष बी.टेक. (F.Y. B.Tech.) विद्यार्थ्यांसाठी विशेष  मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अंतर्गत ‘सक्सेसफुल इंजिनिअरिंग करिअर- कानमंत्र यशस्वी इंजिनिअरिंग करिअरचा' या विषयावर प्रमुख वक्ते इआर.डॉ. मोहन देशपांडे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. 


अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यातील करिअरचे योग्य नियोजन करणे आवश्यक असून, यशस्वी करिअरसाठी ध्येयनिश्चिती, सातत्यपूर्ण प्रयत्न, वेळेचे नियोजन, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ही महत्त्वाची सूत्रे असल्याचे इआर. डॉ. मोहन देशपांडे यांनी सांगितले.


अभियांत्रिकी क्षेत्रातील बदलत्या संधी आणि उद्योगक्षेत्राच्या वाढत्या अपेक्षा याबाबत मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता तांत्रिक ज्ञानासोबत संवादकौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता, नेतृत्वगुण आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित करावीत, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे व कौशल्याचे क्षेत्र ओळखून त्यानुसार करिअरची दिशा निश्चित करावी, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.


या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य व संचालक डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी, प्रथम वर्ष बी.टेक. विभागप्रमुख डॉ. अनिल निकम तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग उपस्थित होता. संस्थेच्या वतीने प्रमुख वक्त्यांचे स्वागत करण्यात आले.


कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.अनिल निकम यांनी उपस्थित मान्यवर, प्रमुख वक्ते, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. या मार्गदर्शनपर कार्यशाळेमुळे  नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयी जागरूकता, आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जा निर्माण झाली. या  कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व संचालक डॉ.कैलाश करांडे यांनी कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.