एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी, पंढरपूर येथे नियंत्रण तंत्रज्ञानाच्या भविष्याची दिशा: मॉडेल प्रेडिक्टिव्ह कंट्रोलवर तज्ज्ञ मार्गदर्शन
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे, आ य ई ई ई विद्यार्थी शाखा एस.के.एन.एस.सी.ओ.ई कोर्टी, पंढरपूर (IEEE Student Branch, SKNSCOE Korti, Pandharpur) यांच्या सहकार्याने ११ सप्टेंबर २०२६ रोजी “मॉडेल प्रेडिक्टिव्ह कंट्रोल (Model Predictive Control)” या विषयावर तांत्रिक सेमिनार आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या सत्रासाठी डॉ. सुशील सुभाष कार्वेकर, सहाय्यक प्राध्यापक, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (WCE), सांगली हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी मॉडेल प्रेडिक्टिव्ह कंट्रोल [Model Predictive Control (MPC)] ची मूलभूत तत्त्वे, उपयोग, कार्यक्षमता आणि आधुनिक विद्युत व औद्योगिक नियंत्रण प्रणालींमधील महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या सत्रातून विद्यार्थ्यांना आधुनिक नियंत्रण तंत्रज्ञान, प्रणालीचे अनुकूलन, मर्यादाधारित नियंत्रण आणि औद्योगिक उपयोग याबाबत मौल्यवान माहिती मिळाली. तज्ज्ञांनी विविध संकल्पना व्यावहारिक उदाहरणांसह स्पष्ट केल्या.
कार्यक्रमास डॉ. के. शिवशंकर, विभागप्रमुख,आयईईई वरिष्ठ सदस्य व आयईईई विद्यार्थी शाखा समुपदेशक (IEEE Senior Member व IEEE Student Branch Counselor) यांची उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान व कौशल्यविकासासाठी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सौ. अंजली चांदणे यांनी कार्य केले. कार्यक्रमाचा समारोप तज्ज्ञ मार्गदर्शकांचे आभार मानून करण्यात आला.

