मशीन रिवाइंडिंगवर एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी,पंढरपूर विद्युत अभियांत्रिकी विभागात एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

 मशीन रिवाइंडिंगवर एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी,पंढरपूर विद्युत अभियांत्रिकी विभागात एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न




पंढरपूर (प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस.के.एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी,पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना (EESA) आणि आ य ई ई ई विद्यार्थी शाखा(IEEE student branch) एस.के.एन.एस.सी.ओ.ई.(SKNSCOE) कोर्टी, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “मशीन रिवाइंडिंग” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलाश करांडे यांनी दिली. 

या कार्यशाळेसाठी श्री. गणेश पांढरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल मशीनमधील रिवाइंडिंगची संकल्पना, मोटरच्या विविध भागांची माहिती, वाइंडिंगचे प्रकार, कॉइल तयार करण्याची पद्धत, स्लॉटमध्ये वाइंडिंग बसविणे, कॉइल कनेक्शन, वायरची निवड, वाइंडिंग डायग्राम तसेच मोटर रिवाइंडिंगदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मशीन रिवाइंडिंगची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. जुन्या वाइंडिंगचे निरीक्षण व काढणे, स्लॉटची पाहणी, आवश्यक मोजमाप घेणे, नवीन कॉइल तयार करणे, कॉइल बसविणे, कनेक्शन करणे तसेच वाइंडिंगनंतर चाचणी घेणे या विविध टप्प्यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना देण्यात आले.


या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता प्रत्यक्ष औद्योगिक व व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. इलेक्ट्रिकल मशीनच्या बिघाडाचे कारण ओळखणे, योग्य वाइंडिंग करणे आणि मशीनची कार्यक्षमता तपासणे याबाबत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. तसेच भविष्यातील रोजगार, उद्योजकता आणि सर्व्हिसिंग क्षेत्रासाठी आवश्यक असणारी व्यावहारिक कौशल्ये विकसित होण्यास या कार्यशाळेची मोठी मदत झाली.


या कार्यक्रमाचे कार्यशाळा समन्वयक म्हणून श्री. ए. आर. मासाळ यांनी नियोजन व समन्वय केला. कार्यक्रमास डॉ. के. शिवशंकर (आयईईई विद्यार्थी शाखा सल्लागार व विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख)(IEEE Student Branch Counselor and HOD), डॉ. स्वानंद कुलकर्णी (उपप्राचार्य) तसेच डॉ. कैलाश करांडे (प्राचार्य, एस.के.एन.एस.सी.ओ.ई.)यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


कार्यशाळेला विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मशीन रिवाइंडिंगचे सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यांचा सुंदर समन्वय साधणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.