एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या स्वायत्त प्रणाली विषयावर एकदिवसीय चर्चासत्र उत्साहात संपन्न.
पंढरपूर,
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या वतीने, भारतीय अभियंता संस्थेच्या सहकार्याने तृतीय वर्षाच्या संगणक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी “सहाय्यापासून स्वायत्त कृतीपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
या चर्चासत्रासाठी श्री. रविंद्र स्वामी, संस्थापक व प्रशिक्षक, सॉफ्टटेक सोल्युशन्स अँड ट्रेनिंग, पुणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वायत्त प्रणाली, निर्णय घेण्याची प्रक्रिया, तर्कशक्ती, नियोजन, साधनांचा वापर, स्वयंचलित कार्यप्रणाली तसेच विविध क्षेत्रांमधील उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील भविष्यातील संधी, बदलते तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांनी विकसित करावयाची आवश्यक कौशल्ये याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारून मार्गदर्शकाशी संवाद साधला.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे तसेच भारतीय अभियंता संस्थेचे समन्वयक प्रा. मनोज कोळी यांची उपस्थिती होती.
या चर्चासत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, त्याचे व्यावहारिक उपयोग आणि भविष्यातील करिअरच्या संधी यांची उपयुक्त माहिती मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

