एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे ‘ऑटोकॅड फॉर इंजिनिअर्स’ साप्ताहिक कार्यशाळा संपन्न*

 *एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे ‘ऑटोकॅड फॉर इंजिनिअर्स’ साप्ताहिक कार्यशाळा संपन्न*



पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामार्फत आयोजित करण्यात आलेली ‘ऑटोकॅड फॉर इंजिनिअर्स’ ही एक आठवड्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.



कार्यशाळेसाठी श्री. पराग देशमुख (कॅडडेस्क, बालाजीनगर, पुणे) यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना ऑटोकॅड सॉफ्टवेअरची मूलभूत तत्त्वे, 2D व 3D रेखाचित्रे, ड्रॉइंग स्टँडर्ड्स तसेच स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यावहारिक उपयोग याविषयी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सरावाद्वारे विविध अभियांत्रिकी रेखाचित्रे तयार करण्याचा अनुभव घेतला.

या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. गणेश लकडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन केले. विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्याचे महत्त्व पटवून दिले. उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी अशा कौशल्यविकास उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक क्षमतांमध्ये वाढ होत असल्याचे सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक, मार्गदर्शक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनीही कार्यशाळेतून मिळालेले ज्ञान व कौशल्य भविष्यातील शैक्षणिक तसेच व्यावसायिक वाटचालीसाठी उपयुक्त ठरणार असल्याची भावना व्यक्त केली.

या कार्यशाळेचे आयोजन सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व कॅडडेस्क, बालाजीनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान देत विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यशाळेचे नियोजनबद्ध व यशस्वी आयोजन होऊ शकले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.