द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष बी.टेक विद्यार्थ्यांचे ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात पार पडला

एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष बी.टेक विद्यार्थ्यांचे ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात पार पडला 



पंढरपूर/ प्रतिनिधी 

एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी व आर्टीफिसिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ (सत्र-1) साठी गुरुवार दिनांक ०२/०७/२०२६ रोजी द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष बी.टेक विद्यार्थ्यांचे ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात पार पडल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुभाष पिंगळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये विद्यार्थ्यांना द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमाची रचना, शैक्षणिक नियोजन, परीक्षा पद्धती, प्रकल्प कार्य, औद्योगिक भेटी, प्रशिक्षण कार्यक्रम, इंटर्नशिपच्या संधी, संशोधन तसेच नवीन उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक उद्दिष्टे निश्चित करून कौशल्यविकासावर विशेष भर द्यावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच यावेळी आर्टीफिसिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. डॉ. नामदेव सावंत यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून नवीन सत्रासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी विभागातील शैक्षणिक उपक्रम, अभ्यासक्रमाची रचना, अध्यापन पद्धती, अंतर्गत व विद्यापीठ परीक्षा, प्रयोगशाळांचा प्रभावी वापर, प्रकल्पाधारित शिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण, इंटर्नशिप, संशोधनाच्या संधी, तांत्रिक स्पर्धा, कौशल्यविकास कार्यक्रम तसेच विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध मूल्यवर्धित उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यासोबतच विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, तांत्रिक कौशल्यांचा विकास, नवोपक्रमशील विचारसरणी, उद्योगाभिमुख ज्ञान संपादन आणि व्यावसायिक नैतिकता यांचा अंगीकार करून उत्कृष्ट करिअर घडविण्याचा संकल्प करावा, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. या ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन विभाग समन्वयक प्रा. उदयकुमार फुले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad