स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचा ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न

 स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचा ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न



पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.



नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना विभागातील विविध शैक्षणिक, तांत्रिक व कौशल्यविकास उपक्रमांची माहिती देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून स्थापत्य अभियांत्रिकी विभागात राबविण्यात येणारे विविध प्रकल्प, संशोधन उपक्रम, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, इंटर्नशिप संधी, तांत्रिक स्पर्धा, कार्यशाळा व मूल्यवर्धित अभ्यासक्रम यांची सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता नवकल्पना, संशोधन व प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यावसायिक कौशल्ये, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल साधने आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनांचा अभ्यास करून भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहण्याचा सल्ला दिला.

यावेळी विभागातील अभ्यासक्रमाची रचना, परीक्षा पद्धती, प्रकल्प कार्य, उद्योगभेटी, प्लेसमेंट उपक्रम तसेच विविध विद्यार्थी संघटना जसे सिव्हिल इंजिनिअरग स्टुडंट्स असोसिएशन (सेसा), आय जी एस स्टुडंट चाप्टर ,आय आय सी सेल, इ डी सी सेल तसेच महाविद्यालयीन इनक्युबेशन सेंटर विषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध शंका उपस्थित केल्या व त्यांचे निरसन करण्यात आले.

कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना विभागातील शैक्षणिक वातावरण, उपलब्ध संधी आणि आगामी उपक्रमांविषयी सर्वांगीण माहिती मिळाली. कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापकांनी केले. प्रा. अजित करांडे, प्रा. ओमकार बिडकर आदींसोबत महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.