अनुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचे ओरिएंटेशन सत्र उत्साहात संपन्न

 अनुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचे ओरिएंटेशन सत्र उत्साहात संपन्न



पंढरपूर | प्रतिनिधी


सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथील अनुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६–२७ च्या प्रारंभी द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.


कार्यक्रमात विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून विभागाची शैक्षणिक परंपरा, विभागाचे व्हिजन–मिशन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) आधारित अभ्यासक्रम, शैक्षणिक दिनदर्शिका, अंतर्गत मूल्यमापन पद्धती तसेच आगामी शैक्षणिक वर्षाचे नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.


विद्यार्थ्यांना वर्षभर राबविण्यात येणारे तांत्रिक व कौशल्यविकास उपक्रम, व्हर्च्युअल लॅब, व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राम्स, तज्ज्ञ व्याख्याने, प्रश्नमंजुषा, प्रकल्पाधारित शिक्षण, संशोधन, नवोपक्रम, इनोव्हेशन क्लब, IETE विद्यार्थी क्लब, इटेलसा क्लब, SWAYAM, NPTEL आणि MOOC अभ्यासक्रम यांची माहिती देण्यात आली. याशिवाय औद्योगिक प्रशिक्षण, औद्योगिक भेटी, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा, प्लेसमेंट, उच्च शिक्षण आणि उद्योजकतेच्या संधींबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.


डॉ. मुलाणी यांनी विद्यार्थ्यांनी नियमित उपस्थिती, शिस्त, वेळेचे प्रभावी नियोजन, तांत्रिक ज्ञान, संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास यावर भर देत अभ्यासाबरोबरच संशोधन, उद्योगाभिमुख प्रशिक्षण व व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय प्रा. सिद्धेश्वर गणगोंडा, प्रा. राहुल घोडके आणि प्रा. महेश झाडे यांनी यशस्वीरीत्या केले. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना विभागातील विविध शैक्षणिक, तांत्रिक आणि सहशैक्षणिक उपक्रमांची सखोल माहिती मिळाली तसेच आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी स्पष्ट दिशा व प्रेरणा प्राप्त झाली.


या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विभागाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.