पंढरपूर न्यायालयासाठी भारतीय रेल्वेच्या दोन वकील तीन वर्षांसाठी नियुक्त नागेश फाटे यांच्या हस्ते नवनियुक्त वकिलांचा सत्कार

 पंढरपूर न्यायालयासाठी भारतीय रेल्वेच्या दोन वकील तीन वर्षांसाठी नियुक्त नागेश फाटे यांच्या हस्ते नवनियुक्त वकिलांचा सत्कार



पंढरपूर | प्रतिनिधी :


मध्य रेल्वे प्रशासनाने पंढरपूर येथील जिल्हा व कनिष्ठ न्यायालयांमधील रेल्वेच्या प्रकरणांसाठी दोन वकिलांची अधिकृत पॅनेलवर नियुक्ती केली आहे. या नियुक्तीला १ जुलै २०२६ पासून तत्काळ प्रभाव लागू झाला असून, ही नियुक्ती तीन वर्षांसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत वैध राहणार आहे.


मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयातील विधी विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार अॅड. पांडुरंग वासुदेव चवरे आणि अॅड. विकास महादेव भोसले यांची रेल्वेच्या वतीने पंढरपूर जिल्हा व कनिष्ठ न्यायालयांमध्ये रेल्वेच्या खटल्यांचे कामकाज पाहण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.


या नियुक्तीनंतर  राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष  नागेश फाटे यांच्या हस्ते अॅड. पांडुरंग चवरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


ह्यावेळी शिवाजी रणदिवे, नवनाथ बचूटे, गणेश दुरुगकर, भास्कर गायकवाड,डॉ. रमेश फाटे, उमेश फाटे,संग्राम कापसे,निवृत्ती भटकर, तेजस देवकते, मोहित कुमार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.