एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी द्वितीय व तृतीय वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांचा ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

 एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी द्वितीय व तृतीय वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांचा ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न 



भंडीशेगाव पंढरपूर :

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी द्वितीय व तृतीय वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांचा ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची रचना, अध्यापन–अभ्यास प्रक्रिया, परीक्षा पद्धती, अंतर्गत मूल्यमापन, प्रयोगशाळा उपक्रम, प्रकल्प कार्य, उद्योगभेटी, इंटर्नशिप, मूल्यवर्धित अभ्यासक्रम, संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता विकास तसेच विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व तांत्रिक उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांना नियमित अध्ययन, कौशल्यविकास, उद्योगाभिमुख शिक्षण, तांत्रिक स्पर्धांमध्ये सहभाग, प्लेसमेंटची तयारी, उच्च शिक्षणाच्या संधी आणि व्यावसायिक विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच व्यक्तिमत्त्व विकासावरही भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमात विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. के. शिवशंकर यांनी विद्यार्थ्यांना विभागाची शैक्षणिक उद्दिष्टे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व आणि उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची रचना, अध्यापन–अभ्यास प्रक्रिया, परीक्षा पद्धती, इन सेमिस्टर एक्झामिनेशन (आय.एस.ई.) (ISE), इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट (आय.सी.ए.) (ICA), प्रयोगशाळा उपक्रम, प्रकल्प कार्य, उद्योगभेटी, इंटर्नशिप, संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता विकास तसेच विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राम्स (Value Addition Programs), कौशल्यविकास प्रशिक्षण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि इतर शैक्षणिक व तांत्रिक उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्युत अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad