यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन सत्र उत्साहात संपन्न

 यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन सत्र उत्साहात संपन्न



पंढरपूर | प्रतिनिधी


सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६–२७ च्या प्रारंभी द्वितीय वर्ष (SY), तृतीय वर्ष (TY) आणि अंतिम वर्ष (LY) यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले.


या सत्रामध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विभागाची शैक्षणिक वाटचाल, आगामी शैक्षणिक वर्षाचे नियोजन तसेच करिअर विकासाच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना विभागाचे व्हिजन व मिशन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) नुसार राबविण्यात येणारा अभ्यासक्रम, शैक्षणिक दिनदर्शिका, आंतरसत्र परीक्षा (ISE) व अंतर्गत सातत्यपूर्ण मूल्यमापन (ICA) नियमावली यांची सविस्तर माहिती देण्यात आली.


यावेळी विभागामार्फत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या चाचणी परीक्षा, प्रश्नमंजुषा, सातत्यपूर्ण मूल्यमापन, व्हर्च्युअल लॅब, तज्ज्ञ व्याख्याने, व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्राम्स, केस स्टडीज, प्रत्यक्ष जीवनातील अभियांत्रिकी उदाहरणे आणि जटिल अभियांत्रिकी समस्यांचे निराकरण या उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.


तसेच संशोधन सुविधा, प्रकल्प कार्य, MESA अंतर्गत विविध उपक्रम, कार्यशाळा, सेमिनार, विद्यार्थी संघटना, स्टुडंट चॅप्टर, SWAYAM, NPTEL, MOOC व इतर स्वयं-अध्ययन अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण, औद्योगिक भेटी, महाविद्यालयाबाहेरील तांत्रिक स्पर्धांमध्ये सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, प्लेसमेंट, उच्च शिक्षण आणि उद्योजकता विकास याबाबतही विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.


डॉ. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विविध कौशल्यविकास उपक्रम, संशोधन, नवोपक्रम, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी नियमित उपस्थिती, शिस्त, वेळेचे नियोजन, तांत्रिक कौशल्ये, संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे महत्त्वही अधोरेखित केले.


या ओरिएंटेशन सत्राचे समन्वयक प्रा. ए. डी. जाधव यांनी नियोजन व आयोजनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. त्यांच्या समन्वयामुळे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.


या ओरिएंटेशन सत्रामुळे विद्यार्थ्यांना विभागातील विविध शैक्षणिक, तांत्रिक आणि सहशैक्षणिक उपक्रमांची स्पष्ट माहिती मिळाली. तसेच आगामी शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक दिशा, प्रेरणा आणि उद्दिष्टे निश्चित करण्यास या सत्राची मोलाची मदत झाली.


या उपक्रमास उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी तसेच प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी या ओरिएंटेशन सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विभागाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प व्यक्त केला.


विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख कौशल्ये आणि उज्ज्वल करिअरच्या दिशेने मार्गदर्शन करणारे हे ओरिएंटेशन सत्र अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.