आयुष्मान आरोग्य मंदिराला राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांची भेट

 आयुष्मान आरोग्य मंदिराला राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांची भेट



पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर येथील जुना कराड नाका सुलेमान चाळ परिसरातील आयुष्मान आरोग्य मंदिर नंबर 2 येथे राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी सदिच्छा भेट देऊन आरोग्य केंद्रातील विविध सुविधा व आरोग्य सेवांची पाहणी केली.


यावेळी आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधा तसेच शासनामार्फत सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी मोफत करण्यात येणाऱ्या विविध महागड्या वैद्यकीय तपासण्यांची माहिती घेऊन नागेश फाटे यांनी आरोग्य केंद्राच्या कार्याचे कौतुक केले. अशा सुविधा गरजू नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असून त्यांचा अधिकाधिक लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


या भेटीदरम्यान मेडिकल ऑफिसर डॉ. राजश्री धनंजय सालविठ्ठल यांनी आरोग्य केंद्रातील शासना कडून दिल्या जाणाऱ्या सर्व मोफत तपासण्याची माहिती दिली.


सदर आरोग्य केंद्र कडे सदर वॉर्ड चे नगरसेवक तथा विद्यमान उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे आणि सर्व आजी माजी नगरसेवकांचे लक्ष असते. 


यावेळी स्टाफ नर्स पुनम वाघमारे, प्रशांत पाटील, दत्तराज गाडे, स्मिता जोशी, सोनाली मोहिते, एस. यू. लिगाडे, औदुंबर नरोटे तसेच ॲड. पांडुरंग चवरे, नवनाथ बचूटे, भास्कर गायकवाड आणि आरोग्य केंद्रातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.