कर्मयोगी विद्यानिकेतन शाळेचे इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश*

 *कर्मयोगी विद्यानिकेतन शाळेचे इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश*



श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेतील विद्यार्थ्यांनी *इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड (Indian Talent Olympiad) परीक्षेत* उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.


या स्पर्धेत इयत्ता पहिली मधील विद्यार्थिनी आरोही रोहित शहा हिने इंग्रजी विषयात राज्यात तृतीय क्रमांक मिळवला, तसेच इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी *सान्वी प्रमोद क्षीरसागर हिने गणित विषयात राज्यात चतुर्थ क्रमांक* पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.

              

याशिवाय शाळेतील युग गुंड इयत्ता पहिली (गणित),राजवर्धन पाटील इयत्ता तिसरी (Logical Reasoning)

आयान मुलाणी इयत्ता सातवी (गणित)

बुशरा शेख (गणित)

स्वरा गुरव ( जनरल नॉलेज) या पाच विद्यार्थ्यांना 'Excellent Award' मिळाला आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कर्मयोगी विद्यानिकेतन विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि दर्जेदार शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई, सर्व शिक्षकवृंद व पालकांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.