भाटघर व उजनी धरणाच्या डावा व उजवा कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील मायनर व तलाव भरून मिळावे.* *नगराध्यक्षा,डॉ.प्रणिता भगीरथ भालके*

 *भाटघर व उजनी धरणाच्या डावा व उजवा कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील मायनर व तलाव भरून मिळावे.*

*नगराध्यक्षा,डॉ.प्रणिता भगीरथ भालके*




पंढरपूर, प्रतिनिधी - *भाटघर व उजनी धरणाच्या डावा व उजवा कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील सर्व मायनर व तलाव तातडीने भरून देण्यात यावेत, या मागणीसाठी लोकनेते आमदार भारत नाना भालके फौंडेशनच्या वतीने नगराध्यक्षा डॉ.प्रणिता भगीरथ भालके यांनी प्रांतअधिकारी सचिन इथापे साहेब  यांना निवेदन दिले. यावेळी मागणीची तत्काळ दखल घेत तलाव भरून घेणेसाठी प्रयत्न करू असे सांगितले.* 


*पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने उजनी व भाटघर धरण पुर्ण क्षमतेने भरलेले आहे. परंतू पंढरपूर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने ओढे, नाले, तलाव व कुपनलिका इ.कोरडे पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती सिंचनाचा,पिण्याचा पाण्याचा तसेच जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. पंढरपूर तालुक्यातील रांजणी, अनवली,कासेगांव,शिरगाव, नेपतगांव, ओझेवाडी व इतर तलाव यांना  उजनी धरणाच्या डावा व उजवा कालव्यावरील विविध मायनरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या अनेक तलावांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असून काही तलाव पूर्णपणे कोरडे पडलेले आहेत. उजनी व भाटघर धरणाच्या डावा व उजवा कालव्यावरून संबंधित मायनरद्वारे परिसरातील सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास शेतकऱ्यांचा शेती सिंचनाचा,पिण्याचा पाण्याचा तसेच जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे असे नगरअध्यक्षा डॉ.प्रणिता भगीरथ भालके यांनी निवेदनात म्हणले  आहे*

   

यावेळी संभाजी कांबळे, दादासो ढोले, मारुती भाकरे, सुखदेव घाटुळ, विजय ढोले, अतुल फरकंडे, विलास शिंदे, विजय ढोले, लखन सुर्यवंशी,  बापुसो भोसले, कपील कोरके, दाजीसो देशमुख, अंकुश डांगे, धनाजी कळकुंबे, पांडूरंग भुसे, सदाशिव जाधव,सुधाकर शिंदे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.