कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या वैष्णवी खटावकर हिचे 'मिशन लक्षवेध' मध्ये निवड.*

 *कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या वैष्णवी खटावकर हिचे 'मिशन लक्षवेध' मध्ये निवड.*



श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथील तृतीय वर्ष मेकॅनिकल अभियांत्रिकी ची विद्यार्थिनी कु. वैष्णवी अनिल खटावकर हिचे २०२५-२६ मधील इंडिया टीम ट्रायल च्या गुणांवर आधारित महाराष्ट्र राज्य शासनाच्या खेळाडूच्या उन्नती साठी असलेला उपक्रम *मिशन लक्षवेध* बालेवाडी पुणे येथे सात जुलै २०२६ रोजी निवड झाली आहे.मिशन लक्षवेध यामध्ये भविष्यात होणाऱ्या नॅशनल, इंटरनॅशनल, ओलंपिक स्तरावरील सामन्यांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.  

पिलीव या ग्रामीण भागात राहणाऱ्या कु. वैष्णवी खटावकर हिने पाच वर्ष तायकांदो चे प्रशिक्षण पूर्ण केले असून राज्य स्तरावरील अनेक सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच 

रायफल व पिस्तोल शूटिंग मध्येही १४ वर्षापासून विद्यापीठ स्तरीय, राज्यस्तरीय व देश पातळीवर वेगवेगळ्या सामन्यांमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. वैष्णवी हिने स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेत प्रशिक्षण पूर्ण करून मे २०२६ मध्ये तिला शूटिंग कोच ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.


या यशासाठी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त रोहन परिचारक, प्राचार्य डॉ. एस पी पाटील, डॉ. ए बी कणसे, रजिस्ट्रार जी डी वाळके,उपप्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर, विभाग प्रमुख डॉ. ए टी बाबर, डॉ. एस व्ही एकलारकर, डॉ. एस एम लंबे, प्रा दीपक भोसले, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, प्रा अभिनंदन देशमाने, प्रा.गणेश बागल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. वैष्णवी हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad