*उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांची राष्ट्रवादी सैनिक सेलच्या शिष्टमंडळाशी विविध मागण्या संदर्भात भेट ;* *उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांच्यात सकारात्मक चर्चा ;*

 *उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांची राष्ट्रवादी सैनिक सेलच्या शिष्टमंडळाशी विविध मागण्या संदर्भात भेट ;*


*उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांच्यात सकारात्मक चर्चा ;*



मुंबई (प्रतिनिधि) : मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांची महाराणी येसुबाईंच्या माहेरकडील राजेशिर्के घराण्याचे वंशज तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेत विविध सामाजिक, राजकीय व माजी सैनिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.


दि. १६ जून २०२६ रोजी झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादी माजी सैनिक सेलच्या वतीने विविध मागण्यांचे लेखी निवेदन उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना सादर करण्यात आले. तसेच चर्चे दरम्यान पक्ष संघटन बांधणी, राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी, शेतकरी कर्जमाफी, सामाजिक व ऐतिहासिक विषयावर तसेच आजी-माजी सैनिक, पोलीस व संरक्षण क्षेत्राशी संबंधित माजी कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी, समस्या व प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.


बैठकी दरम्यान महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत माजी सैनिकांना अधिक प्राधान्य देणे, त्यांच्यासाठी अतिरिक्त पदांना मंजुरी देणे तसेच सैनिक कल्याणाशी संबंधित विविध मागण्यांवर विशेष भर देण्यात आला. सैनिकांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे सोडविण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.


       यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी राज्यातील कष्टकरी शेतकरी, माजी सैनिक आणि देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांच्या सन्मान व हक्कांसाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत नक्कीच सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासनही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांनी दिले.


      यासंगी राजेशिर्के घराण्याचे वंशज राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के, प्रदेश उपाध्यक्ष श्रीमंत राठोड, प्रदेश संपर्क प्रमुख चंद्रकांत गायकवाड, माजी सैनिक चंद्रकांत ढेंबरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी सैनिक आणि मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.