स्वेरीतील स्क्रूटिनी सेंटरचा विद्यार्थ्यांना हमखास फायदा होणार - प्राचार्य डॉ. यु.आर.मुंडे स्वेरीमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केंद्राचे थाटात उदघाटन


स्वेरीतील स्क्रूटिनी सेंटरचा विद्यार्थ्यांना हमखास फायदा होणार

                                                                                     - प्राचार्य डॉ. यु.आर.मुंडे

स्वेरीमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केंद्राचे थाटात उदघाटन



पंढरपूर- ‘स्वेरीच्या वतीने व पालकांच्या मागणीनुसार उघडलेल्या या कॅप रजिस्ट्रेशन केंद्राचा बारावी उत्तीर्ण झालेल्या व उच्च शिक्षणाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के फायदा होणार आहे याचा मला विश्वास आहे. मी स्वेरीचे व डॉ. बी.पी. रोंगे सरांचे नाव खूप ऐकून आहे. तंत्रशिक्षण क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम सातत्याने व यशस्वीपणे करत असताना अनेक विद्यार्थ्यांना या उपक्रमांचा फायदा झाला आहे. स्वेरीमध्ये शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आपल्या करिअर मध्ये यशस्वी झालेले आहेत. राज्यातील अनेक विद्यार्थी स्वेरीत प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात हे चित्र नेहमी पहायला मिळते. डॉ. रोंगे सरांचे व स्वेरीचे कार्य अभिमानास्पद व गौरवास्पद आहे. या सर्व कारणांमुळे स्वेरीतील कॅप रजिस्ट्रेशन केंद्र विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल.’ असे प्रतिपादन पंढरपूरच्या विवेकवर्धिनी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. यु.आर.मुंडे यांनी केले. 

       ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी कोणतीही द्विधा स्थिती होऊ नये, अडचण येवू नये, योग्य दिशा आणि अचूक माहिती मिळून योग्य पद्धतीने रजिस्ट्रेशन करता यावे. यासाठी स्वेरीमध्ये ‘कॅप रजिस्ट्रेशन केंद्रा’चे अर्थात ‘स्क्रूटनी सेंटर’चे नुकतेच उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. यु.आर.मुंडे बोलत होते. प्रास्ताविकात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.उत्तम अनुसे म्हणाले की, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बी.पी. रोंगे सरांनी १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीत अथवा प्रशासकीय क्षेत्रात कशी निवड होईल व उत्तम करिअर कसं घडेल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न होत आहेत. प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे साहजिकच प्रत्येक वर्षी स्वेरीच्या यशाचा आलेख देखील उंचावत आहे. या केंद्रात उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्गाची टीम सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करण्यासाठी सज्ज आहे. स्वेरी संचलित अभियांत्रिकी (पदवी) महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापासून ते प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, त्यांची पडताळणी, शैक्षणिक पात्रता, प्रवेश घेताना तसेच महाविद्यालयांची निवड करताना विद्यार्थ्यांनी करिअरचा विचार करून नेमक्या कोण-कोणत्या महत्वाच्या बाबी पहाव्यात याबाबत माहिती देण्यात येत आहे. त्यानंतर कॅप राउंडस्, कॅम्पस प्लेसमेंट, ब्रँचची निवड, मागील वर्षातील विविध विभागांचे कट ऑफ मार्क्स या व इतर संबंधित गोष्टींबाबत विद्यार्थी व पालक यांना योग्य व खात्रीशीर मार्गदर्शन मिळत आहे. तसेच रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला आयडी व पासवर्ड कोणालाही शेअर करू नये याची आवर्जून काळजी घ्यावी.' अभियांत्रिकीच्या रजिस्ट्रेशन संदर्भात अधिक माहितीसाठी अधिष्ठाता प्रा. उत्तम अनुसे (मोबाईल क्र.-९१६८६५५३६५) व प्रा. पोपट आसबे (७८२१००४६४७) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या उदघाटन प्रसंगी डिप्लोमाचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, डॉ.डी.एस. चौधरी, तज्ञ प्राध्यापक वर्ग,पालक व विद्यार्थी उपस्थित होते. 

चौकट-

    ‘विद्यार्थी व पालकांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करत असताना गोंधळ उडू नये व प्रवेशाची ही प्रक्रिया अचूकपणे व्हावी तसेच करिअरच्या दृष्टीने एक ठोस निर्णय घेता यावा यासाठी या कक्षाची निर्मिती केली आहे. एकूणच बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा कक्ष विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नक्कीच फायदेशीर ठरेल.                                                                                                                          

                                                                                                                               -प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.