स्वेरीमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा



स्वेरीमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा




पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त वृक्षारोपण हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. यामध्ये विविध प्रकारच्या रोपट्यांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

         शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी स्वेरी कॅम्पसमध्ये रोपट्यांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाची सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इस्कॉन, कोल्हापूर येथील पुरुषोत्तम आनंददास महाराज तसेच केरले (जि. कोल्हापूर)मधील हनुमान हायस्कूलचे रणदिवे व आदी उपस्थित होते. त्याचबरोबर स्वेरी संचलित कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.सतीश मांडवे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एन. ए. तळवलकर, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या डॉ. वनिता जाधव, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर आणि एमबीएच्या डॉ. मिनल भोरे, ग्रीन टीमचे समन्वयक प्रा. कुलदीप पुकाळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे तसेच प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेत पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त आयोजिलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यास तसेच हरित भविष्याच्या निर्मितीस चालना मिळणार आहे, हे मात्र नक्की. 


चौकट:

स्वेरीचा संपूर्ण कॅम्पस हा 'ग्रीन कॅम्पस' म्हणून ओळखला जातो. भारताचे ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी स्वेरीच्या प्रांगणात लावलेल्या झाडांचे आजही संगोपन केले जात आहे. स्वेरीत आजपर्यंत सुमारे आठ हजार झाडे लावण्यात आलेली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.