साप्ताहिक लोक साहित्य' चे शरद पवार यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन!
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरेत भर घालणाऱ्या 'साप्ताहिक लोक साहित्य' या मराठी साप्ताहिकाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभली होती.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, सद्यस्थितीत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आणि लोकसाहित्याचा वारसा जपण्यासाठी अशा साप्ताहिकांची नितांत गरज आहे.
याच प्रसंगी माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे खासदार सुप्रियाताई सुळे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख,आमदार रोहितदादा पवार, आमदार जितेंद्र आव्हाड , माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे , खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार धैर्यशीलभैय्या मोहिते-पाटील, खासदार भास्कर भकरे, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, आमदार बापूसाहेब पठारे,आमदार अभिजित पाटील,आमदार राजू खरे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या साप्ताहिकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आवाज लोकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

