पंढरपूर डाक विभाग व आयआयटी कॉम्प्युटर्स, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधार अपडेट कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद**

 *पंढरपूर डाक विभाग व आयआयटी कॉम्प्युटर्स, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधार अपडेट कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद** 



पंढरपूर : भारतीय डाक विभागाच्या पंढरपूर डाक विभागाचे अधिक्षक श्री. मुन्ना कुमार सर यांचे संकल्पनेतून भारतीय डाक आणि आयआयटी कॉम्प्युटर्स, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष आधार कार्ड अपडेट कॅम्पला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

     या कॅम्पमध्ये आधार कार्डातील नावातील दुरुस्ती, जन्मतारीख बदल, फिंगरप्रिंट अपडेट, फोटो अपडेट आदी महत्त्वाच्या सेवा विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. दिवसभरात तब्बल 43 विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला.

      डाक विभागाचे आधार ऑपरेटर श्री.वसीम मुजावर यांनी दिवसभर विद्यार्थ्यांची आधार अपडेट प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. तसेच या कॅम्पला भारतीय डाक विभागाचे सहा. डाक अधीक्षक श्री.नागेश कंजेरी , विकास अधिकारी श्री. सोमनाथ कोरके, विपणन अधिकारी श्री. विष्णू कांदे यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली व उपक्रमाचे कौतुक केले.

     हा आधार कॅम्प यशस्वी करण्यासाठी दत्ता कळकुंबे, रोहिणी मांजरे यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे संचालक नितीन आसबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

विद्यार्थ्यांना आधुनिक व आवश्यक शासकीय सेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयआयटी कॉम्प्युटर्स, पंढरपूर सातत्याने विविध उपक्रम राबवत असून या आधार कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.