उत्तर सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देणार काम करणाऱ्यांना संधी पक्षनिरीक्षक नागेश फाटे यांनी घेतल्या विविध इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती

 उत्तर सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देणार काम करणाऱ्यांना संधी 


पक्षनिरीक्षक नागेश फाटे यांनी घेतल्या विविध इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती



पंढरपूर /प्रतिनिधी 


उत्तर सोलापूर तालुक्यात नूतन पदाधिकारी निवडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विविध सेलच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते आ.जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख तसेच कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या आदेशानुसार पार पडल्या. 

वडाळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात पक्षाचे निरीक्षक नागेश फाटे यांनी इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या.


यावेळी पक्ष वाढीसाठी आणि पक्ष अधिक बळकट करण्यासाठी कोणते प्रयत्न करता येतील, याबाबत इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेण्यात आली. पक्षाच्या माध्यमातून युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून संघटन विस्तार करण्यावर भर देण्यात आला.

उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या इच्छुक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने मुलाखतीत सहभाग नोंदवला.

या मुलाखतीदरम्यान तालुकाध्यक्ष तुषार साठे, उद्योग व्यापार विभागाचे प्रदेश सदस्य विजय काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मुलाखतीसाठी शुभम पैकीकर, स्वप्निल कुंभार, दीपक क्षीरसागर, उमेश लोकरे, प्रतीक साठे, सुशांत देवकुळे, सागर मोहिते आणि ज्ञानेश्वर लोंढे यांनी आपली मते मांडत मुलाखती दिल्या.

उत्तर सोलापूर तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या मुलाखतींना महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.