पंढरपूर सिंहगडमध्ये “ओव्हरहेड विद्युत पारेषण वाहिनीच्या कामगिरीचे विश्लेषण” विषयावर ऑनलाईन तज्ञांचे व्याख्यान संपन्न*

 *पंढरपूर सिंहगडमध्ये “ओव्हरहेड विद्युत पारेषण वाहिनीच्या कामगिरीचे विश्लेषण” विषयावर ऑनलाईन तज्ञांचे व्याख्यान संपन्न*



पंढरपूर : प्रतिनिधी

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “ओव्हरहेड विद्युत पारेषण वाहिनीच्या कामगिरीचे विश्लेषण” या विषयावर ऑनलाईन तज्ञांचे व्याख्यान उत्साहात पार पडले, अशी माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या व्याख्यानात प्रा. माणिक टी. शिंदे (सहाय्यक प्राध्यापक, विद्युत अभियांत्रिकी विभाग, एन. बी. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर) यांनी गुगल मीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी फेझर आकृती तसेच ॲनिमेटेड व्हिडिओंच्या साहाय्याने लघु, मध्यम व दीर्घ विद्युत पारेषण वाहिन्यांच्या कामगिरीचे विश्लेषण तसेच त्यांचे विविध प्रकार आणि पद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली.

हे व्याख्यान गुरुवार, दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते. या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना अंतिम वर्ष प्रकल्प तसेच मिनी हार्डवेअर प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. या व्याख्यानासाठी द्वितीय वर्षातील ६५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

हा ऑनलाईन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. के. शिवशंकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. व्ही. खांडेकर तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.