सिंहगड पंढरपूरमध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना उत्साहात निरोप*

 *सिंहगड पंढरपूरमध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना उत्साहात निरोप*



पंढरपूर : प्रतिनिधी

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत ‘ईईएसए’ आणि ‘आय. ई. ई. ई. स्टुडंट ब्रँच कोर्टी ’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजता विद्युत चर्चासभेत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण तसेच भावनिक वातावरणात पार पडला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. एस. डी. कटेकर तसेच विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख व आय. ई. ई. ई. स्टुडंट ब्रँच समुपदेशक डॉ. के. शिवशंकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास गौरविणे व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देणे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. के. शिवशंकर यांनी विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासाबद्दल अभिनंदन करून त्यांना सतत शिकत राहण्याचा, तांत्रिकदृष्ट्या सक्षम राहण्याचा आणि व्यावसायिक मूल्ये जपण्याचा सल्ला दिला. उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाण्याचे आवाहन करताना नैतिकता व जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच डॉ. एस. डी. कटेकर यांनी करिअरच्या संधी, उद्योगक्षेत्राच्या अपेक्षा आणि कौशल्य विकासाचे महत्त्व स्पष्ट केले.

या प्रसंगी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी व विभागासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कु. श्रद्धा किरण पंधे हिला ‘सर्वोत्कृष्ट निरोप घेणारी विद्यार्थिनी’ म्हणून गौरविण्यात आले. तसेच विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांची मनोगते, जुन्या आठवणींना उजाळा देणारे क्षण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. कनिष्ठ विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली, तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व आठवणी सर्वांसोबत शेअर केल्या.

प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आशीर्वाद दिले. स्मरणीय ठरलेल्या या कार्यक्रमाचा समारोप स्मृतीचिन्ह वितरण व सामूहिक छायाचित्रणाने झाला.

कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन ईईएसए समन्वयक श्री. पी. बी. व्यवहारे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.