स्वेरीत एमएचटी-सीईटी परीक्षा सुरळीत सुरु
तंत्रज्ञान-सक्षम व पारदर्शक परीक्षा प्रणाली
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये एमएचटी-सीईटी २०२६ ही परीक्षा सुरळीतपणे सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. या परीक्षेचे व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी संगणकांवर आधारित विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित आणि पारदर्शक परीक्षा प्रणाली राबविण्यात येत आहे. यामुळे परीक्षार्थी व पालक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे विविध अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेली एमएचटी-सीईटी ही परीक्षा राज्यभर घेतली जात असून स्वेरीमध्ये दि. २५ मार्च २०२६ पासून ही परीक्षा सुरु झाली असून ती शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या तारखांनुसार दि. १७ मे २०२६ पर्यंत चालणार आहे. यामध्ये तीन वर्ष व पाच वर्षांसाठी असलेले विधी अभ्यासक्रम (लॉ), इंजिनिअरिंग (पीसीएम), फार्मसी (पीसीबी), मास्टर ऑफ कॉम्प्यूटर अॅप्लीकेशन्स (एमसीए) व बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर अॅप्लीकेशंन्स (बीसीए) या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेल्या एमएचटी-सीईटी येथे होत आहेत. कांही अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा पूर्ण झाल्या आहेत तर कांही अभ्यासक्रमांच्या परीक्षा अद्याप सूरु आहेत. या परीक्षेमध्ये बॉयलर प्लेट भाषा– पर्याय १ मधून महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षाने सीईटी २०२६ साठी तंत्रज्ञान-आधारित उपाययोजनांचा व्यापक संच अंमलात आणला असून परीक्षा प्रक्रियेची प्रामाणिकता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून आधार कार्ड, अपार कार्ड यांची पडताळणी, चेहरा ओळख (फेशियल रिकग्निशन) आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानामुळे प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांची मजबूत पडताळणी सुनिश्चित केली जात आहे. याशिवाय ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे तो प्रत्येक केंद्रीकृत हॉलमध्ये सीसीटीव्ही च्या माध्यमातून देखरेख आणि थेट निरीक्षण केले जात आहे तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर मानकीकृत प्रोटोकॉल लागू केल्यामुळे सुरक्षित आणि छेडछाड-रहित परीक्षा वातावरण तयार झाले आहे. या सर्व उपक्रमांमुळे न्यायतेसह जबाबदारी सुनिश्चित करणारी तंत्रज्ञान-सक्षम प्रणाली निर्माण झाली असल्याचे दिसत आहे. तसेच बॉयलरप्लेट भाषा– पर्याय २ मधून सीईटी–२०२६ ही तंत्रज्ञान-प्रथम परीक्षा प्रणालीकडे झालेली महत्त्वपूर्ण वाटचाल दर्शवते ज्यामध्ये विश्वासार्हता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक उपायांचा वापर केला आहे. बायोमेट्रिक्स आणि चेहरा ओळख यांद्वारे रिअल-टाईम ओळख पडताळणी, तसेच तंत्रज्ञान-आधारित देखरेख आणि कडक डिजिटल नियंत्रण यामुळे गैरप्रकारांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. थेट सीसीटीव्ही, केंद्रीकृत मॉनिटरिंग प्रणाली, तक्रार निवारण व आक्षेप नोंदणीसाठी सुलभ डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने सीईटी परीक्षेची प्रक्रिया अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि विद्यार्थी-केंद्रित झाली आहे. या तंत्रज्ञान-आधारित दृष्टिकोनामुळे सुरक्षितता, न्याय आणि भविष्याभिमुख परीक्षा पद्धतीमुळे पालकांचा व परीक्षार्थ्यांचा या परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक भक्कम झाला आहे. सदरची परीक्षा शासनाच्या वतीने स्वेरीमध्ये सुरळीतपणे सुरु असून शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच स्वेरीच्या वतीने संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अंतोष द्याडे, प्रा.रोहित पोरे व संगणक तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच प्रा. उत्तम अनुसे, प्रा. पोपट आसबे, इतर प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी हे परीक्षा नेहमीप्रमाणे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत. विद्यार्थी व पालकांना महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ परीक्षेसंदर्भात असलेले नियम व अटी सहज पद्धतीने समजावून सांगितल्या जातात. त्यानंतर परीक्षार्थ्यांना संबंधित हॉलपर्यंत पोहोचवले जाते. त्यानंतर पालक वर्ग कॅम्पस मध्ये सर्वत्र असलेल्या झाडांच्या दाट सावलीत तसेच स्वेरीत असलेल्या वातानुकुलीत हॉलमध्ये आराम करतात हे चित्र दिसून येत आहे. स्वेरीने केलेल्या सोई- सुविधांमुळे पालकवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र सीईटी २०२६ मध्ये तंत्रज्ञान-सक्षम परीक्षा प्रणालीसह नवा मानदंड स्थापित केला आहे. बायोमेट्रिक्सपासून तंत्रज्ञान-आधारित देखरेखीपर्यंत सीईटी २०२६ ने तंत्रज्ञानाद्वारे परीक्षेची पारदर्शकता अधिक मजबूत केली आहे.
चौकट- स्वेरीमध्ये सीईटी परीक्षेच्या निमित्ताने आलो होतो. कन्येला परीक्षा कक्षात सोडल्यानंतर आमची कॉलेज प्रशासनाने कॅम्पसमध्ये चांगली सोय केली होती. कडक ऊन असताना आम्हा पालकांसाठी वातानुकुलीत हॉलमध्ये केलेल्या आरामदायी सोईबद्धल स्वेरी प्रशासनाचे मनपूर्वक आभार. कॅम्पस देखील सर्वोत्तम आहे. –सिद्धेश्वर कोणदे, पालक, सोलापूर.

