सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न पक्ष निरीक्षक नागेश फाटे यांनी घेतला जिल्ह्याच्या पक्षकार्याचा आढावा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती ठरविण्यावर भर

 सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न


पक्ष निरीक्षक नागेश फाटे यांनी घेतला जिल्ह्याच्या पक्षकार्याचा आढावा


आगामी निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती ठरविण्यावर भर



पंढरपूर / प्रतिनिधी 


 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार गट) सातारा जिल्हा निरीक्षक नागेश फाटे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. 

सुरुवातीला सातारा राष्ट्रवादी भवन येथील बैठकीत पक्ष निरीक्षक नागेश फाटे यांनी जिल्हाध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांकडून पक्षकार्याचा आढावा घेतला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुका प्रमुख, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 या बैठकीत जिल्ह्यातील पक्ष, संघटन मजबूत करण्यावर, कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यावर तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती ठरविण्यावर भर देण्यात आला. 

यावेळी नागेश फाटे सर्व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत संघटन वाढीसाठी प्रत्येक गाव-पातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या तसेच कार्यकर्ते हेच पक्षाचे खरे बळ असून त्यांच्याच जोरावर पक्षाला पुन्हा उभारी देता येईल. तसेच युवक, महिला आणि विद्यार्थी संघटनांना बळकट करून पक्षाचा विस्तार करण्याचे आवाहन करण्यात आले. 

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील म्हणाले की, सध्या जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त झाले असून नव्याने जोमाने कार्यकारणी तयार करण्यात येत असून काम करणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येऊन आगामी नेमणुका करण्यात येतील. तसेच प्रत्येक तालुक्यात व शहरात स्वतंत्र बैठका घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये गावोगावी बूथनिहाय कार्यकर्त्यांची साखळी तयार करून सातारा जिल्हा राष्ट्रवादीमय करण्यासाठी सर्वजण पुन्हा जोमाने कामाला लागू असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले.


सदर बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे, साहिल (बाबा) शशिकांत शिंदे, परिजात दळवी, नरेश देसाई, सतीश चव्हाण, सुनील गाडेकर, शफिक शेख, विक्रम सिंह, सचिन फडतरे, किरण जाधव, चौधरी गोरखनाथ, नलवडे राजकुमार, पाटील उमेश, देशमुख नंदकुमार, मोरे नितीन, लवंगाडे घनश्याम शिंदे महिला जिल्हाध्यक्ष सौ रंजना जगदाळे, अर्चना देशमुख, समिंदरा जाधव, तेजस्वी केसरकर, उषा जाधव, कुसुमताई, पूजा बनसोडे, सुवर्णताई पाटील, यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे सर्व सर्व आजी-माजी पदाधिकारी विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad