सिंहगड महाविद्यालय येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात प्रायमावेरा सॉफ्टवेअर प्रशिक्षण कार्यशाळा*

 *सिंहगड महाविद्यालय येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात प्रायमावेरा सॉफ्टवेअर प्रशिक्षण कार्यशाळा*



पंढरपूर – एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने तृतीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी “प्रोजेक्ट मॅनेजमेंट युजिंग प्रायमावेरा” या विषयावर तीन दिवसीय सॉफ्टवेअर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा १२ ते १४ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात पार पडली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या कार्यशाळेसाठी पुणे येथील कॅड डेस्क, बालाजीनगरचे प्रशिक्षक श्री. पराग देशमुख यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रायमावेरा सॉफ्टवेअरच्या साहाय्याने प्रोजेक्ट प्लॅनिंग, शेड्युलिंग, रिसोर्स मॅनेजमेंट, तसेच बांधकाम प्रकल्पांचे नियोजन व नियंत्रण याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली.

सदर प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना नेटवर्क डायग्राम, गॅन्ट चार्ट, क्रिटिकल पाथ ओळखणे, प्रकल्पाची कालमर्यादा निश्चित करणे आणि प्रकल्प व्यवस्थापनातील आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रात उपयोगी पडणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

या कार्यशाळेला तृतीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी डॉ यशवंत पवार, प्रा. गणेश लकडे, प्रा. 

मिलिंद तोंडसे आदीसह विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad