सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात स्पर्धा परीक्षा तयारी विषयी मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन*

 *सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात स्पर्धा परीक्षा तयारी विषयी मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन* 



पंढरपूर : एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात विद्यार्थ्यांना शासकीय सेवेमधील संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी इन गव्हर्मेंट सेक्टर अँड हाऊ टू प्रिपेयर फॉर टेक्निकल एमपीएससी अँड यूपीएससी  या विषयावर विशेष आमंत्रित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आय जी एस स्टुडंट चाप्टर सहकार्याने संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. शुभम हरी शिंदे हे उपस्थित होते. त्यांनी बी.टेक. शिक्षण 2021 मध्ये पूर्ण केले असून पुढे आय आय टी मुंबई येथे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या विषयात एम.टेक. पदवी संपादन केली आहे. तसेच त्यांनी अनेक वेळा गेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 

शुभम शिंदे यांनी सुरुवातीला महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या 2021 च्या मुलाखतीपर्यंत मजल मारली  त्यानंतर 2025 मध्ये टाऊन प्लॅनिंग असिस्टंट  पदासाठी त्यांची निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2023 मध्ये त्यांनी राज्यात 16 वा क्रमांक मिळवला आहे. सध्या ते पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन येथे सहायक कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत.

आपल्या व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांना शासकीय क्षेत्रातील विविध संधी, एमपीएससी व यूपीएससी तांत्रिक परीक्षांची तयारी कशी करावी, अभ्यासाचे नियोजन, संदर्भ पुस्तके, वेळेचे व्यवस्थापन आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेली सातत्यपूर्ण मेहनत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतःचा अभ्यास प्रवास आणि अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत लक्ष्य निश्चित करून सातत्याने अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता येते, असा संदेश दिला.

कार्यक्रमास द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सत्यवान जगदाळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. डॉ. यशवंत पवार, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. तृतीय वर्ष वर्गातील विद्यार्थिनी कुमारी पूजा घायाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सत्यवान जगदाळे यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शासकीय सेवेमधील संधी व स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad