स्वेरीमध्ये ‘क्षितिज-२ के २६’ हा राज्यस्तरीय तांत्रिक परिसंवाद उत्साहात संपन्न


स्वेरीमध्ये ‘क्षितिज-२ के २६’ हा राज्यस्तरीय तांत्रिक परिसंवाद उत्साहात संपन्न



पंढरपूर : गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या ‘मेसा’ अर्थात मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन तर्फे आयोजित ‘क्षितिज-२ के २६’ हा राज्यस्तरीय तांत्रिक परिसंवाद शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्यातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजमधून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे बाहेरील महाविद्यालयांमधून सुमारे २५० विद्यार्थी यात सहभागी झाले होते. त्यामुळे महाविद्यालय परिसरात तांत्रिक आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले होते.

        कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे तथा नवोपक्रम आणि सामाजिक उद्योजकता क्षेत्रातील प्रसिद्ध मार्गदर्शक तन्मय मुखर्जी हे उपस्थित होते. त्यांच्या सोबत एसीआयसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिग्विजय चौधरी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. उदघाटनप्रसंगी दोन्ही मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उद्योग, स्टार्टअप्स आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी शोधणारे न राहता नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे आणि उद्योजक बनण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले. या राज्यस्तरीय परिसंवादामध्ये ब्रँड इट अप, लॉजिक लॉप, माइंड स्पार्क आणि कॅड अशा विविध तांत्रिक व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ब्रँड इट अप या स्पर्धेमध्ये गिरिजा राऊत, ऋतुजा सुळे, सलोनी साखरे आणि गौरी गुजरे यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला तर कल्याणी ढगे, सिद्धी भोसले, यश दळवी आणि सुनील गोंडलवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. लॉजिक लॉप या स्पर्धेत रियान बागवान यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर कोमल तुराबे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. कॅड स्पर्धेमध्ये गायत्री नागटिळक यांचा प्रथम तर इरफान शकरगे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. माइंड स्पार्क या बौद्धिक स्पर्धेत अविनाश कुलकर्णी यांचा प्रथम तर विठ्ठल दामजी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धांमधील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत रोख पारितोषिके, स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांचा सहकार्याने आणि उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार व मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस. बी. भोसले यांच्या नेतृत्वाखाली डॉ. डी. डी. रोंगे व समन्वयक प्रा. के. एस. पुकाळे यांनी अंतर्गत कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये मेसाचे अध्यक्ष मंगेश डुबल, उपाध्यक्ष हुसैन मुलाणी, सचिव पायल पुरी, खजिनदार प्रणव पवार तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. ‘क्षितिज-२ के २६’ या राज्यस्तरीय तांत्रिक परिसंवादामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य प्रदर्शित करण्याची, नवकल्पना मांडण्याची आणि विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांशी ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची उत्तम संधी मिळाली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवसंशोधनाची प्रेरणा निर्माण होत असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.