*महिला सर्पमित्राने पुन्हा एकदा वाचवले विषारी नागापासून कुटुंबाचे प्राण*
नागपूर/ प्रतिनिधी
महिला दिवसाच्या पूर्व संध्येला सायंकाळी ठीक ७:३० वाजता नागपूर च्या मनीष नगर स्थित सिक्युरिटी गार्ड मोरेश्वर उताणे यांच्या घरी जे की एक छोटीशी खोली ज्यात ते आपली पत्नी आणि दोन मुलांसह उदरनिर्वाह करतात.त्यांनी एक मोठा काळा साप फुलांच्या कॅरीतून सरपटत जाऊन त्यांच्या बेड च्या खाली शिरतांना पहिला .त्यांनी लगेच आपल्या घर मालकाला याची माहिती दिली प्राणोती कांबळे या घर मालकीण ने कॉलनीतल्या ठाकरे यांच्याकडून चैताली चा नंबर घेतला जिने कॉलनीतल्या जवळपास सर्व च घरातून याआधी पण साप सुरक्षित पकडलेले होते म्हणून नागरिकांनी चैताली चा नंबर दिला. प्राणोती कांबळे ने फोन केल्यावर लगेच चैताली सापाला रेस्क्यू करायला पोहोचली पण एकच दहा बाय दहा ची खोली ज्यात कुटुंबाचे चार सदस्य सिक्युरिटी गार्ड त्यांची पत्नी शालिनी उताणे आणि दोन मुले त्यातच त्यांचे संसाराला लागणारे सर्व उपयोगी समान घरात भरून .घरात पाय ठेवायला ही जागा नव्हती अश्यात सापाला बेड च्या बाहेर काढणे म्हणजे जीवाला धोका च होता ,घरचे समान खूप जास्त असल्यामुळे बेड खाली साप नेमका कुठे लपून असेल याचा अंदाज येत न्हवता सर्व घरचे लोक आणि नागरिकांमध्ये भीती चे सावट पसरले होते. खोली मध्ये जाऊन सर्व सामान सरकवण्याची कोणाची हिंमत झाली नाही .नागरिकांच्या भितीची अवस्था पाहता चैताली ने स्वतःच खोलीत प्रवेश करून सर्व घरातले सामान एक एक करून बाहेर काढून सर्व घर खाली केले यात घरच्या लोकांनी पण मदत केली , समान पूर्ण खाली केल्यावर बेड च्या कोपऱ्यात जवळपास पाच ते साडेपाच फुटाचा विषारी काळा नाग आढळून आला जो फारच रागात आक्रमक अवस्थेत होता बेड खूपच छोटा होता आणि साप कोपऱ्यात बेड च्या पायाला मजबूत वेटोळे घालून बसलेला होता बाहेर येत न्हवता एक दीड तासाच्या मेहनती नंतर साप सुरक्षित पकडल्या गेला आणि घरच्या लोकांचा व नागरिकांचा जीव भांड्यात पडला कुटुंबातील चार ही लोकांच्या जीवाला धोका होऊ शकत होता पण लगेच पोहचून चैताली ने सापाला सुरक्षित रेस्क्यू केले ,सर्व नागरिकानी चैताली चे खूप खूप धन्यवाद केले ,चैताली ने नागरिकांना सतर्क आणि सावध राहण्याचे आवाहन केले आणि सांगितले की गर्मी मुळे वन्यजीव आणि साप गारव्या च्या शोधात तुमच्या घरी आणि आसपास,पाण्याच्या माठाजवळ ,फुलांच्या कॅरीत जिथे थंड माती असते तिथे येतात आणि आपले भक्ष शोधतात ,म्हणून आपल्या घरात कुडा कचरा जमा होऊ देऊ नये जेणेकरून उंदीर येणार नाही आणि त्यांच्या शोधात साप येणार नाहीत .सापाला सुरक्षित पकडून चैताली ने निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.

