*पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग विषयावर जनजागृती सत्र संपन्न*
पंढरपूर | प्रतिनिधी
पंढपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी विभागामध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग या विषयावर जनजागृती सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग क्लब चॅप्टरचे अध्यक्ष श्री. उदय काळे उपस्थित होते.
कार्यक्रमास प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य स्वानंद जी. कुलकर्णी, यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी तसेच समन्वयक प्रा. ए. एस. कुलकर्णी आणि प्रा. ओ. एन. ठिगळे उपस्थित होते.
यावेळी उदय काळे यांनी नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगची मूलभूत संकल्पना, त्याचे औद्योगिक महत्त्व आणि विविध चाचणी पद्धतींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. अल्ट्रासोनिक टेस्टिंग, रेडिओग्राफिक टेस्टिंग, मॅग्नेटिक पार्टिकल टेस्टिंग आणि एडी करंट टेस्टिंग या पद्धतींचा उद्योगांमध्ये कसा वापर केला जातो, याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले. उत्पादन प्रक्रियेत दोष शोधणे, गुणवत्ता नियंत्रण राखणे आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे यासाठी नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
तसेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) च्या संशोधन व विकास विभागातील करिअर संधींबाबत माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या मार्गदर्शन सत्राला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवून लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी प्रमुख मार्गदर्शकांचे आभार मानले व असा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी होणेकरिता विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

