पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विषयावर व्याख्यान संपन्न..
पंढरपूर
पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत तृतीय वर्ष यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी “ॲटोमेशन अँड कंट्रोल इंजिनियरींग ” या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या व्याख्यानासाठी डॉ. व्ही. एस. बिरादार (सह. प्राध्यापक व विभागप्रमुख, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग, एनबीएन कॉलेज ऑफ इंजिनियरींग, सोलापूर) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील ऑटोमेशन, कंट्रोल सिस्टिम्स, आधुनिक उत्पादन प्रक्रियेत ऑटोमेशनचे वाढते महत्त्व तसेच या क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांनी भविष्यातील तांत्रिक संधींबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डी. आर. गिराम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी व प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर घालण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
या अतिथी व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना ऑटोमेशन व कंट्रोल इंजिनिअरिंग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, औद्योगिक उपयोग आणि करिअरच्या संधींबाबत उपयुक्त माहिती मिळाली.हा कार्यक्रम यशस्वी होणेसाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख वक्यांचे आभार प्रा. डी.आर.गिराम यांनी मानले.

