राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन जिल्हा निरीक्षकांची ऑनलाईन बैठक संपन्न...*
पंढरपूर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे वतीने आज सर्व नुतन जिल्हा निरिक्षक यांची ऑनलाईन मिटींग राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले प्रेरणास्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार श्री शशिकांत शिंदे साहेब, आमदार रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीत आज पार पडली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील पक्ष निरीक्षक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांनी पक्ष निरीक्षक यांचेशी संवाद साधताना सांगितले की, पक्षाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना सर्वांना विश्वासात घेऊन गाव पातळीवर कार्य करणाऱ्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची यांचा आढावा घेण्यात यावा. पक्ष वाढीसाठी व बळकटीसाठी काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्राधान्याने संधी देण्यात यावी तसेच सर्वसामान्य जनतेपर्यंत आपल्या पक्षाची ध्येय धोरणे पोहोच करावी असे सांगितले...
याप्रसंगी नागेश दादा फाटे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, पक्षाने माझ्यावर दिलेली जाबदारी प्रामाणीक पणे पार पाडीन तसेच पक्ष मजबुतीसाठी स्थानिक पातळीवरील ज्येष्ठ पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन पक्ष संघटना बळकटीवर भर देवून पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोच करुन पक्षवाढीसाठी कटीबध्द राहू असे फाटे यांनी सांगीतले.

