स्वेरीच्या प्राध्यापकांनी दिली पाबळच्या विज्ञान संकुलास भेट

 

स्वेरीच्या प्राध्यापकांनी दिली पाबळच्या विज्ञान संकुलास भेट



पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस)च्या चार प्राध्यापकांनी पाबळ (ता. शिरूर, जि.पुणे) येथे प्रसिद्ध असलेल्या ‘विज्ञान आश्रमा’ला भेट देवून तेथील नवनवीन संशोधन व विज्ञानाची माहिती घेतली. प्राध्यापकांच्या या भेटीचा फायदा स्वेरीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे हे मात्र निश्चित!

       स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, संशोधन अधिष्ठाता डॉ. एम.एस.अभिषेक व डॉ.एच.बी. रोंगे यांनी पाबळच्या विज्ञान आश्रमाची माहिती जाणून घेतली. संशोधन विभागाच्या दृष्टीने सदर माहिती महत्वाची आहे. ग्रामीण समुदायांच्या गरजांसाठी बनविलेला हा आश्रम आहे. या केंद्राचे ध्येय ‘ग्रामीण विकासाद्वारे तांत्रिक शिक्षण आणि त्या शिक्षणाद्वारे शाश्वत, मानव-केंद्रित ग्राम विकास’ हे आहे. गेल्या चाळीस वर्षांत या विज्ञान आश्रमाच्या माध्यमातून तांत्रिक शिक्षणात नाविन्यपूर्ण प्रयोग केले गेले आहेत. या प्रयत्नांद्वारे शेकडो ग्रामीण तरुण आणि तरुणींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम केले, त्यांचा आत्मविश्वास वाढवला आणि नाविन्यपूर्णतेची भावना देखील जोपासली. त्यापैकी काहीजण यशस्वी ग्रामीण उद्योजक होवून त्यांनी स्थानिक समस्या सोडवल्या आहेत. शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी वचनबद्ध असलेल्या या पाबळला स्वेरीच्या प्राध्यापकांनी भेट देवून सविस्तर माहिती जाणून घेतली. पाबळच्या विज्ञान आश्रमात तेथील संचालक डॉ. योगेश कुलकर्णी यांनी स्वेरीच्या प्राध्यापकांचे स्वागत करून विज्ञान आश्रमाची माहिती दिली. विज्ञान आश्रम हे नवनवीन कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी चालना देते. या विज्ञान आश्रमाच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फॅब्रिकेशन लॅबचे प्रात्यक्षिक दिले जाते. याची संपूर्ण माहिती स्वेरीमधील प्राध्यापकांनी घेतली. सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालकांनी या सहभागी प्राध्यापकांचे अभिनंदन करून त्यांच्या संशोधन वृत्तीचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad