सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन*

 *सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन*



पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग आणि पी. सी. ई. आर. एफ., पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय सुरक्षा दिना’ निमित्त ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


सदर व्याख्यान ४ मार्च २०२६ रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडले. या कार्यक्रमात “सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम फॉर कन्स्ट्रक्शन साईट” या विषयावर श्री. प्रविण घाटोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी बांधकाम क्षेत्रातील सुरक्षितता व्यवस्थापन, कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, जोखीम मूल्यांकन पद्धती तसेच बांधकाम स्थळी अपघात प्रतिबंध याविषयी सविस्तर माहिती दिली. कन्स्ट्रक्शन साईटवर सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम प्रभावीपणे लागू केल्यास कामगारांचे प्राण वाचतात, अपघातांची शक्यता कमी होते आणि काम अधिक सुरक्षित व कार्यक्षम पद्धतीने पार पडते, असे त्यांनी सांगितले.


या व्याख्यानासाठी द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून विषयावरील शंकांचे निरसन करून घेतले.


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे व डॉ. यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रम समन्वयक प्रा. मिलिंद तोंडसे तसेच विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रा. गणेश लकडे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.


या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बांधकाम क्षेत्रातील सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली असून त्यांच्या व्यावसायिक ज्ञानात मोलाची भर पडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad