पंढरपूर–मंगळवेढा मतदारसंघाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात 501 कोटींची तरतूद – आ. समाधान आवताडे


पंढरपूर–मंगळवेढा मतदारसंघाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात 501 कोटींची तरतूद – आ. समाधान आवताडे




पंढरपूर मंगळवेढा तालुका प्रतिनिधी :

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात सादर केलेल्या राज्याच्या 2026–27 च्या अर्थसंकल्पात पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर शहर उर्वरित रिंग रोड,भीमा नदीवर दोन ठिकाणी पूल बांधणे,ठाकरे चौकात उड्डाणपूल बांधणे मंगळवेढा उपसा सिंचन योजना,रस्ते आदी विविध विकासकामांसाठी 501 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून सरकारने मतदारसंघाच्या विकासासाठी तिजोरी खुली केल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

सध्या मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात साठी भरीव अशी तरतूद आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून झाली असून एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली अर्थसंकल्पीय तरतूद ही दोन्ही तालुक्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे

त्यामध्ये बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी गतवर्षीच्या अर्थसंकल्पात देखील तरतूद करण्यात आली होती आणखी त्या योजनेच्या कामासाठी तरतूद 60 कोटी देण्यात आले आहेत.तसेच

वाखरी - टाकळी - -अनवली मुंढेवाडी. प्रजिमा 83 (पंढरपूर रिंग रोड) मध्ये रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे. ता. पंढरपूर

218 कोटी रुपये,

गुंजेगाव तनाळी कासेगाव ते पंढरपूर प्रजिमा 168 मध्ये रस्ता रुंदीकरण सह सुधारणा करणे तालुका पंढरपूर 31 कोटी 50 लाख,गोपाळपूर रांझणी ओझेवाडी रा.मा.392 मध्ये रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे ता. पंढरपूर 

38.कोटी लवंगी ते आसबेवाडी रा.मा 389 मध्ये रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे ता.मंगळवेढा

3 कोटी 20 लाख,गुंजेगाव ते आंधळगाव व हुन्नूर गावाजवळील रस्ता लांबी रा.मां 391 मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे ता.मंगळवेढा

4 कोटी 30 लाख,खोमनाळ नाका ते बायपास रस्ता व सलगर गावाजवळ रस्ता सुधारणा करणे ता. मंगळवेढा 2कोटी 50 लाख,

भाळवणी ते तळसंगी प्र जी मा.74 मध्ये रस्ता सुधारणा करणे ता.मंगळवेढा 4 कोटी, 

मारापुर ते गुंजेगाव प्रजिमा 76 मध्ये रस्ता सुधारणा करणे. ता. मंगळवेढा3 कोटी 50 लाख,

बोराळे गावातील लांबी प्रजीमा 61 मध्ये रस्ता सुधारणा करणे ता. मंगळवेढा 1कोटी 50 लाख, 

अरळी ते तालुका हद्द प्रजिमा 63 मध्ये रस्ता सुधारणा करणे ता. मंगळवेढा 1 कोटी,

बोहाळी ते खर्डी रा.मा 391 मध्ये रस्ता सुधारणा करणे ता. पंढरपूर. 1 कोटी 50 लाख,

उंबरगाव ते सोनके प्रजिमा 85 मध्ये रस्ता सुधारणा करणे ता.पंढरपूर 2 कोटी,

खर्डी ते तपकिरी शेटफळ प्रजिमा 111 मध्ये रस्ता सुधारणा करणे ता. पंढरपूर. 1 कोटी 50 लाख, 

रांजणी ते सरकोली रस्ता सुधारणा करणे ता. पंढरपूर. 6 कोटी,

पंढरपूर ठाकरे चौक ते टाकळी रोड रुंदीकरणासह उड्डाणपूल बांधणे ता. पंढरपूर 50 कोटी 16 लाख,मुंढेवाडी ते अजनसोंड रोड प्रजिमा 113 मध्ये भीमा (चंद्रभागा) नदीवर पूल बांधणे ता. पंढरपूर 

32 कोटी 50 लाख,

पंढरपूर भीमा नदीवरील दगडी पूल शेजारी नवीन पूल बांधणे साठी 45 कोटी. अशी एकूण

501 कोटी 16 लाख रुपयाची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी मार्च 2026 27 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे. पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिर जीर्णोद्धाराचे काम चालू असून यातील दुसऱ्या टप्प्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे तसेच पंढरपूर शहरात होणाऱ्या ठाकरे चौक ते टाकळी चौक व दगडी फुलाशेजारील भीमा नदीवरील दुसरा पूल, तसेच मुंडेवाडी अर्जुनसोड रस्त्यावर होणाऱ्या दुसऱ्या पुलामुळे तसेच वाखरी मुंढेवाडी रिंग रोडमुळे शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे दरवर्षी येणाऱ्या लाखो भाविकांना या नवीन होणाऱ्या कामांमुळे वाहतुकीची कोंडी सुटणार असल्यामुळे वारकऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.तसेच मंगळ तालुक्यातील मंगळा उपसा सिंचन योजनेसाठी झालेली तरतूद योजनेच्या पूर्ततेच्या दिशेने वाटचाल असून मंगळेकरांसाठी ही आनंदाची बाब आहे.या निधीमुळे मतदारसंघातील,रस्ते,उड्डाणपूल,भीमानदीवर पूल यासारख्या पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत होणार असून सिंचन, वाहतूक व वीजपुरवठा व्यवस्थेत सुधारणा होऊन शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंढरपूर मंगळ मतदार संघातील जनतेने नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक भाजपाला मतपेटीच्या माध्यमातून केलेल्या मदतीला सरकारने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यासाठी या अर्थसंकल्पात विक्रमी भरघोस निधी देत सरकारने उतरवला आहे. त्याकामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

 एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री,

श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री

छत्रपती शिवेंद्रराजे भोसले 

ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री

 जयकुमार गोरे यांचे सहकार्य लाभल्याचे आ.समाधान आवताडे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad