स्वेरीतील शिस्त व संस्कारामुळे पाल्यांचा व्यक्तीमत्व विकास -पालक प्रतिनिधी सौ.अर्चना बाबर


स्वेरीतील शिस्त व संस्कारामुळे पाल्यांचा व्यक्तीमत्व विकास                                                                                                                          

                                                               -पालक प्रतिनिधी सौ.अर्चना बाबर



स्वेरीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचा पालक मेळावा संपन्न

पंढरपूर- ‘पाल्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वेरी कॉलेजमधील प्राध्यापक वर्ग सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात, परिश्रम घेतात. त्यातून स्वेरीमधील शिस्त व संस्कारामुळे आमच्या पाल्याच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडत आहे. त्यामुळे आम्ही मनस्वी समाधानी आहोत. सर्वात वेगळेपण जपणारी शिक्षणसंस्था म्हणून स्वेरीची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.’ असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी सौ.अर्चना बाबर यांनी केले. 

         गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचा पालक मेळावा शनिवार, दि.१४ मार्च २०२६ रोजी संपन्न झाला. या मेळाव्यात महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ.अर्चना बाबर ह्या बोलत होत्या तर पुरुष पालक प्रतिनिधी म्हणून मल्लिकार्जुन शेट्टी हे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व विभागप्रमुख डॉ.चित्रसेन मैतेई यांच्या नेतृत्वाखाली या पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. दिपप्रज्वलनानंतर प्रास्ताविकात प्रा. व्ही.ए. सावंत यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील अद्ययावत साधनांची माहिती, वसतिगृह, रात्र अभ्यासिका, इफेक्टिव्ह टीचिंग-लर्निंग, तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात राबविण्यात येणारे विविध उपक्रम व गुणवत्तेबाबत महिती दिली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक डॉ.सचिन खोमणे यांनी स्वेरीमध्ये विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी कोणकोणती प्राथमिक तयारी करून घेतली जाते यावर भाष्य करून मागील वर्षापर्यंतची प्लेसमेंटची आकडेवारी सादर केली. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. उत्तम अनुसे यांनी ‘सातत्यपूर्ण अभ्यासक्रमामुळे स्वेरीतील विद्यार्थी यशस्वी होतात' याबाबत लक्षवेधी भूमिका मांडली. पुरुष पालक प्रतिनिधी म्हणून बोलताना मल्लिकार्जुन शेट्टी म्हणाले की, ‘स्वेरी म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असलेली शिक्षणसंस्था आहे.’ असे सांगून स्वेरीत शिक्षण घेण्याचे फायदे सांगितले. उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार म्हणाल्या की, ‘विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालकांचा विशेष वाटा असतो. त्यामुळे पालकांनी वेळोवेळी महाविद्यालयात येवून संबंधित विभागाला भेट देऊन आपल्या पाल्याच्या प्रगतीबाबत माहिती जाणून घ्यावी. यामुळे शिक्षक, पालक व संस्था यामध्ये योग्य तो संवाद घडून येतो. याचा फायदा विद्यार्थ्यांच्या जडणघडणी मध्ये होतो.’ असे सांगितले. यानंतर मान्यवरांनी पालकांच्या सर्व शंकांचे निरसन केले. यावेळी जवळपास ६० पालक तसेच इन्फ्रास्ट्रक्चर अधिष्ठाता डॉ.डी.ए. तंबोळी, इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. पालक मेळाव्यानंतर पालक वर्ग व प्राध्यापक वर्ग यांनी एकत्रित चर्चा करून पाल्याचे करिअर कसे उज्वल होईल यावर चर्चा केली. हा पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. डी.डी डफळे यांनी केले तर समन्वयक प्रा.व्ही.ए. सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad