एस. के. एन. सिंहगड कॉलेज, पंढरपूर येथे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाची पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न

 *एस. के. एन. सिंहगड कॉलेज, पंढरपूर येथे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाची पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न




पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी पालक-शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डॉ. यशवंत पवार तसेच पालक प्रतिनिधी सौ. बुध्याळ मॅडम यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.

यावेळी सौ. बुध्याळ मॅडम यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी पालक-शिक्षक सभेचे महत्त्व अधोरेखित करत महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती पालकांना दिली.

तसेच डॉ. यशवंत पवार यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विभागात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देताना विभागाने मिळविलेल्या यशाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. यावेळी विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील माजी विद्यार्थिनी कुमारी वर्षा भोसले व कुमारी नम्रता खरात यांची भूमी अभिलेख विभागात निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी पायल लोखंडे व कुमारी श्वेता राजपूत यांनी केले, तर प्रा. मिलिंद तोंडसे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सभेला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad