पंढरपूर सिंहगडमध्ये ‘फायबर ऑप्टिक व देखभाल यांमधील व्यावहारिक आव्हाने’ विषयावर अतिथी व्याख्यान संपन्न

 *पंढरपूर सिंहगडमध्ये ‘फायबर ऑप्टिक व देखभाल यांमधील व्यावहारिक आव्हाने’ विषयावर अतिथी व्याख्यान संपन्न*



पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी “फायबर ऑप्टिक व देखभाल यांमधील व्यावहारिक आव्हाने” या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सांगोला येथील फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. गणेश शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी प्रा. गणेश शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

प्रा. गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना फायबर ऑप्टिक नेटवर्कच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतील आव्हाने समजावून सांगितली. यात फायबर केबलचे योग्यरित्या डिप्लॉयमेंट करणे, नेटवर्कमध्ये दोष शोधणे, तांत्रिक समस्यांचे निराकरण करणे, देखभाल करताना येणाऱ्या अडचणी आणि व्यावहारिक समस्या या सर्व बाबींचा समावेश होता. तसेच त्यांनी दूरसंचार क्षेत्रातील तांत्रिक अडचणी आणि उद्योगातील प्रत्यक्ष अनुभवातून आलेल्या आव्हानांबाबत सविस्तर माहिती दिली.

या मार्गदर्शनात तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबतच उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव घेण्याची संधी मिळाली. फायबर ऑप्टिक नेटवर्क व त्याच्या देखभालीतील व्यावहारिक आव्हाने विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली, कारण यामुळे त्यांना भविष्यातील प्रकल्प व उद्योगात काम करताना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी समजून घेता येतील. या सत्रात ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध शंका विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. वैभव गोडसे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी मानसी शितोळे यांच्यासह इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad